सर्वसामान्य शेतक-यांच्या आडचणींना धावून येणारे एक दमदार नेतृत्व.


सर्व गोरगरीब शेतकऱ्यांशी "नाळ" असणारे एक दिलखुलास व्यक्तिमत्त्व.

सोलापूर // प्रतिनिधी

पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणूक नुकतीच जाहीर झाली आहे त्यासोबत अनेक इच्छुक उमेदवार ही समोर आले परंतु या पोटनिवडणुकीसाठी समाधान आवताडे यांच्या नावाची चर्चा रंगत आहे


पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील तरुण युवकांना समाधान आवताडे यांनी आपल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती करून नव युवकांना पुढे येण्याची संधी दिली तरुणांना उद्योग व्यवसायात येण्यासाठी रोजगार मेळाव्यामधून संबोधित केले होते. कोणा गोरगरीब कष्टकरी शेतक-यांच्या आडचणी सोडविणे असो या माध्यमातून सोडविण्याचा प्रयत्न केला.


ज्या प्रमाणे मंगळवेढा तालुक्यात समाधान आवताडे यांनी नव युवकांना एमआयडीसीच्या माध्यमातून रोजगार निर्मिती केली गेल्या काही दिवसांपासून युवकांमध्ये समाधान दादा आवताडे यांची नावाची चर्चा रंगत असून एकीकडे घराणेशाही तर तर विरुद्ध तरुणाई अशी चर्चा रंगू लागली आहे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना सर्वसामान्य कष्टकरी शेतकऱ्यांशी समाधान दादा अवताडे यांनी एक आपुलकीची नाळ जोडली आहे. सर्व गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवून त्यांना योग्य प्रकारे न्याय देण्याची भूमिका पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात केली आहे


आज पर्यंत ज्यांनी-ज्यांनी पंढरपूर मंगळवेढा तालूक्यामध्ये  विरोध केला ते सर्वजण आता समाधान दादा अवताडे यांच्या सोबत वाटचाल करीत असून एक यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली आहे याचप्रमाणे ही निवडणूक जर तरुणाईने हातात घेतली तर  समाधान अवताडे यांच्याकडून मंगळवेढा पंढरपूर तालुक्याचा उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही दोन्ही तालूक्यामधून होत आहे.


रस्ते कंट्रक्शनच्या माध्यमातून समाधान दादा आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील अनेक बेरोजगार तरुणांना एक रोजगाराची संधी निर्माण करून दिली त्याचबरोबर पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील एक उच्च शिक्षित तरुण वर्ग आज पुणे-मुंबई कडे आकर्षित न होता आपल्या स्वतःचा एक उद्योग व्यवसाय असावा व आपले नाव असावे यासाठी धडपडत असताना श्री समाधान (दादा) आवताडे यांनी या सर्व नव युवकांना आपल्या उद्योग व्यवसायाच्या माध्यमातून रोजगाराची मोठी संधी निर्माण करून देऊन त्यांचा कायमचा प्रश्न सोडवण्याची महत्त्वपूर्ण भूमिका आज पंढरपूर मंगळवेढा तालुक्यामध्ये घेतली आहे.अत्यंत कमी कालावधी मध्ये पंढरपूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात एक कार्यकर्त्यांचे मोठे जाळे निर्माण करून केले.

जे पंढरपूर तालुक्यातील व शहरातील घराणेशाहीला कंटाळले नवतरुण युवक होते त्यांनी समाधान दादा आवताडे यांच्या सोबत जाऊन एक महत्त्वाचा निर्णय घेत आपली पुढील पिढी ही कशी सुख समाधानाने व गुण्यागोविंदाने जीवन जगेल याचा विचार करून समाधान दादांच्या विचारांना व कार्यकर्तृत्वाला प्रेरित होऊन बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी दादांच्या गटात प्रवेश घेतल्याची अनेक उदाहरणे आहेत.


सातत्याने अनेक दशकापासून पंढरपूर तालुक्याच्या राजकारणामध्ये व समाज कारणांमध्ये एकाच नावाचा बोलबाला होता तो खोडून काढत समाधान दादा आवताडे यांनी पहिलाचा 2014 त्यानंतर 2019 साली चांगल्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान के गीत घराणेशाहीला मात देण्याचा चांगला प्रयत्न केला. 2019 आली तर त्यांनी अपक्ष राहून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील अनेक गावांमध्ये आपले मताधिक्य वाढवत चांगला दबदबा निर्माण केला होता.

ज्याप्रमाणे का बदलतो त्याप्रमाणे वेळी बदलते या उक्तीप्रमाणे दादांनी पंढरपूर तालुक्याचे असलेली आपली नाळ कधी दिली नाही.

या पार्श्वभूमीवर येत्या दोन दिवसांमध्ये विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज भरण्याची सुरुवात होत असताना समाधान दादा आवताडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करावा व पुन्हा एकदा विधानसभा पोटनिवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणावी अशा आशयाचे मेसेज वर ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडिया वरती तुफान धुमाकूळ घालत असताना समाधान दादा आवताडे हे आपल्या सर्व पदाधिकारी समर्थक व कार्यकर्त्यांचे ऐकून आपला उमेदवारी अर्ज दाखल करतात का येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे


 यामुळेच पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणुकीसाठी समाधान अवताडे यांच्या नावाची चर्चा होत आहे तरी समाधान आवताडे हे कोणत्या पक्षामधून उभा राहणार याची सुद्धा सर्वत्र होत आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget