भाजप कडूनही इच्छुक वाढले परिचारक, पाटील, आवताडे, रोंगे भाजपा पक्षाकडून पोटनिवडणूक लढण्यासाठी इच्छुक




कल्याणराव काळे भाजपमध्येच असल्याचा खुलासा

बाळाभाऊ भेगडे यांनी दिली पत्रकार परिषदेत माहिती


सोलापूर // प्रतिनिधी 

सध्या राज्यातील चाललेली महाविकास आघाडीची परिस्थिती पाहता या पोटनिवडणुकीत भाजपकडूनही अनेकजण इच्छुक असून यामधे

आ. प्रशांतराव परिचारक, उद्योजक अभिजित पाटील,  समाधानआवताडे, आणि बी पी रोंगे या प्रमुख नेत्यांनी

पंढरपूर - मंगळवेढा मतदार संघासाठी  भाजपकडून पोटनिवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा बूथ अभियान प्रभारी बाळाभाऊ भेगडे यांनी सांगितले.


भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे माजी राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्हा बूथ अभियान प्रभारी बाळाभाऊ भेगडे यांची पत्रकार परिषद रविवारी झाली. यावेळी आमदार प्रशांत परिचारक, माजी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे, भाजपाचे धैर्यशील मोहिते पाटील, श्रीकांत देशमुख, बी. पी. रोंगे, भास्कर कसगावडे उपस्थित होते.


पुढे बाळाभाऊ भेगडे म्हणाले, महावसुली सरकारने राज्याचे वाटोळे केले आहे. पोलिसांच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांची खंडणी मागण्याचे काम राज्याचे गृहमंत्री करतात. हे राज्याचे दुर्दैव आहे. ठाकरे सरकार नसून वसुली सरकार आहे, अशी भावना सर्वांची झाली आहे. यामुळे पोटनिवणुकीत भाजपला यश मिळेल असे मत सोलापूर जिल्हा बूथ अभियान प्रभारी बाळाभाऊ भेगडे यांनी व्यक्त केले.

 सध्या चेअरमन कल्याणराव काळे यांच्याबाबत विचारले असता ते कुठेही जाणार नसून भाजपमध्ये असल्याचा खुलासाही यावेळी स्वतः आ. परिचारक यांनी केला आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget