पत्रकार सुरक्षा समितीच्या ठाणे जिल्ह्य अध्यक्ष अरुण ठोंबरे यांची पुनर्नियुक्ती;लवकरच नवीन कार्यकारणी जाहीर करणार

  


वृत्तसंस्था // प्रतिनिधी  

पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष यशवंतराव पवार आणि सोलापूर जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी कार्याध्यक्ष रामचंद्र सरवदे हे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्यासाठी कल्याण येथील शासकीय विश्राम गृह मध्ये आले असता त्यांनी नवीन वर्षाची जिल्हा कार्यकारणी निवड करण्यासाठी पुन्हा एकदा ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी अरुण ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली. एक वर्ष अरुण ठोंबरे यांनी उत्तम काम करून संघटना बांधणी साठी पत्रकारांना संघटित करून उपोषण व आंदोलन करून न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे तसेच उल्हासनगर अंबरनाथ शहापूर मुरबाड भिवंडी आणि कल्याण तालुक्यात पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष देऊन त्यांच्याकडून पत्रकार संघटना मजबूत करण्याचे काम केले . 

यशवंत पवार यांनी पुन्हा एकदा ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी अरुण ठोंबरे यांची नियुक्ती करून पत्रकार सुरक्षा समिती मध्ये काम करण्याची संधी दिली आहे. लवकरच नवीन कार्यकारणी निवडण्यात येईल असे ठाणे जिल्हा अध्यक्ष अरुण ठोंबरे यांनी जाहीर केले.  यावेळी रामेश्वर गवई गौतम वाघ प्रदीप रोकडे भारत कारंडे जाफर वणू कैलास जाधव मनोज जैन संजय साळवे अरुण पाटील विजय सिंग दीनानाथ कदम सह अनेक पत्रकार उपस्थित होते

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget