सोलापूर // प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने विविध भागातील पदाधिकाऱ्यांच्या नव्याने नियुक्त्या करण्यात आले असून कोकण विभाग अध्यक्षपदी श्री प्रदिप गोविंद रोकडे यांची पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेश अध्यक्ष श्री यशवंतराव पवार यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आल्या आहेत याप्रसंगी पत्रकार सुरक्षा समितीच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष म्हणून श्री अरुण ठोंबरे यांची पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली असून सदरील निवडी कल्याण येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित दिनांक १५/३/२०२१रोजी करण्यात आले होते पत्रकार सुरक्षा समितीच्या होणाऱ्या राज्य स्तरीय पुरस्कार सोहळ्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना समितिच्या विषेश पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे यशस्वीनी हाॅल बेलवली बदलापूर पश्चिम या ठिकाणी सदर पुरस्कार सोहळा संपन्न होणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार साहेब यांनी सांगितले आहे.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष श्री रामचंद्र सरोदे, ठाणे जिल्हा अध्यक्ष श्री अरुण ठोंबरे, ऊल्हासनगर तालुका अध्यक्ष श्री रामेश्वर गवई,मनोज जैन ठाणे जिल्हा उपाध्यक्ष,संजय साळवे ठाणे जिल्हा सचिव,गौतम वाघ महासचिव ऊल्हासनगर तालुका,जग्गनाथ जावळे कोषाध्यक्ष ऊल्हासनगर तालुका,सलिम मन्सूरी,भरत कारंडे बदलापुर शहर अध्यक्ष, संतोष भगत, कैलास जाधव उपाध्यक्ष बदलापुर शहर, दिनानाथ कदम, संपर्कप्रमुख ठाणे जिल्हा,लव सहानी, अरुण पाटील भिवंडी तालुका अध्यक्ष, जाफर वनु आंबरनाथ तालुका कोषाध्यक्ष,रुतिकेश रोकडे जिल्हा सदस्य, विजय सिंह, ठाणे जिल्हा ग्रामीण सचिव,अक्षय शिंदे आदी पत्रकार सुरक्षा समितीचे पदाधिकारी उपस्थित होते या वेळी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रदिप गोविंद रोकडे यांना कोकण विभाग अध्यक्ष पदी व श्री अरुण ठोंबरे यांची ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी फेर नियुक्ती झाल्या बद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या,

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.