वसीम रिजवी ला अटक करण्याची भाजपा अल्पसंख्यक मोर्चा महाराष्ट्र ची मागणी.




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

लखनौ उत्तरप्रदेश येथे राहणारे शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करुन इस्लाम धर्माच्या सर्वात पवित्र धर्मग्रंथ कुरआन मध्ये बदल करुन त्याच्यात असलेले आयात मधुन एकुण 26 आयात वगळण्यात यावी अशी मागणी केली. सुप्रिम कोर्ट रिझवीची ही याचिका दाखल न करता फेटाळून लावेल अशी अपेक्षा आम्हाला आहे.  मात्र वसीम रिजवी याने याचिका दाखल केल्या नंतर माध्यमांना बोलतांना कुरआन व इस्लाम धर्माचे सुरवातीचे तीन खालीफा विरुध्द अनेक खोटे व बीनबुडाचे आरोप केले आहेत. त्याच्या वक्तव्यामुळे इस्लाम धर्माच्या भावना दुखावल्या आहेत. इतर धर्माच्या लोकांमध्येही अशी चुकीची माहिती गेल्यामुळे इस्लाम धर्मा बाबत इतर समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम वसीम रिजवी याने केले आहे.

 युध्द प्रसंग (battle ground) आयती व अत्याचार विरुद्ध लढण्याची शिकवण देणारया आयती (श्लोक) चुकिच्या पद्धतीने मांडण्याचा  प्रयत्न वसीम रिजवी ने केला.

मुस्लिम समाजाच्या भावना दुखविणाऱ्या व धर्मा धर्मात तेढ निर्माण करणारण्याचा प्रयत्न करणाऱ्या वसीम रिजवी विरुध्द गुन्हा दाखल करुन कठोर कार्यवाही करावी  असे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात भाजपा अल्पसंख्यक प्रदेश सरचिटणीस श्री. अतिक खान, जिल्हाध्यक्ष श्री. मूसा सौदागर, अल्पसंख्यक शहराध्यक्ष श्री. चेतन देसरडा,  जिल्हा उपाध्यक्ष श्री. जुम्मा  खान व शहर सचिव श्री. हाजी कुरेशी यांनी कोविडसंदर्भातील शासकीय आचारसंहितेचे पालन करित जालना जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन  दिले.

Tags

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget