पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या महिला भगिनींचा महिला दिनानिमित्त सत्कार. पंढरपूर शहर व तालुक्यामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान सोहळा आज पंढरपूर शहरांमध्ये मोठ्या थाटामाटा मध्ये संपन्न झाला. व अनेक महिलांचा सन्मान सोहळा संपन्न झाला. या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार शाल श्रीफळ देऊन करण्यात आला. प्रत्येक महिलांनी राष्ट्रमाता जिजाऊसाहेब पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक महिलेने काम करावे व पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक महिलेने या समाजाचे कार्य करावे व धाडसाने समोर यावे असे मत शिव सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी सांगितले. नितीन काळे यांच्या हस्ते अनेक कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नितीन काळे यांच्या हस्ते सविता दूधभाते शुभांगी जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्ती साधनाताई राऊत श्रेया ताई भोसले दुर्गाताई माने पूजा लवंगकर सविता दूधभाते भाग्यश्री शिंदे शुभांगी जाधव आशा नांगरे रेखा चंद्रराव अविंदा गायकवाड संध्याताई काळे कविता राजमाने डॉक्टर संगीता ताई पाटील या सर्व महिलांचा सत्कार शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माऊली भाऊ हळवणकर बाबा ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष उत्तम बाबा चव्हाण रासपचे पंकज देवकते रासपचे संजय लवटे सर विजय शिरतोडे यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी अनेक महिला भगिनी व मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.