मोहोळ ला 1 मे रोजीच सुरू होणार सुसज्ज डेडिकेटेड कोवीड सेंटर




ऑक्सीजन लाईन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आमदार यशवंत(तात्या)माने यांनी घेतला आढावा


मोहोळ शहर आणि तालुक्यातील कोवीड बाधित रुग्णांसाठी मोहोळ शहरात मध्यवर्ती ठिकाणी त्वरित डेडिकेटेड कोविड सेंटर सुरु करा आणि त्यासाठी लागणारा स्टाफ त्वरित उपलब्ध करून द्या अशा स्पष्ट सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित दादा पवार यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना दिल्या होत्या. 


यासाठी आमदार यशवंत माने यांनी दक्ष लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला आहे. मोहोळचे माजी आमदार तथा विधानसभेचे मार्गदर्शक  राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ तालुका आणि शहरातील कोवीड रुग्णांसाठी त्वरित डेडिकेटेड कोवीड सेंटर सुरू व्हावे यासाठी आमदार यशवंत माने हे  सातत्याने प्रयत्नशील आहेत. येत्या 1 मे रोजी मोहोळ शहर आणि तालुक्यातील कोविंड रुग्णांसाठी जिल्ह्यातील सर्वात मोठे आणि अद्यावत कोवीड सेंटर मोहोळमध्ये सुरू होत आहे. पुणे महामार्गालगत असलेल्या शासकीय मुलींच्या वस्तीगृह इमारतीमधील ऑक्सीजन लाईन आणि इलेक्ट्रिकल कामांची पाहणी आज मोहोळचे आमदार यशवंत माने यांनी केली. येत्या 48 तासात हे सर्व काम पूर्ण होऊन 25 ऑक्सिजन बेड आणि 75 नॉन ऑक्सिजन बेड बाधित रुग्णांना उपलब्ध होणार आहेत. उर्वरित दीडशे बेड हे पुढील आठवड्यात रुग्णांच्या सेवेत उपलब्ध असतील. या इमारतीच्या रंगरंगोटीचे काम जरी झाले असले तरी इलेक्ट्रिकल वायरिंग आणि फिटिंगचे काम होणे बाकी होते. या बाबत सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ. मिलिंद शंभरकर यांच्याशी आमदार यशवंत माने यांनी संपर्क साधत सदर इलेक्ट्रीकल फिटिंगचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार या इमारतीमधील इलेक्ट्रिकल फिटिंगचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या कोवीडची वाढती संख्या ध्यानात घेऊन ऑक्सीजन लाईन टाकण्याच्या कामाला तंत्रज्ञ उपलब्ध होत नव्हते. ही बाब ध्यानात घेत बारामती येथील औद्योगिक वसाहती मधून आमदार यशवंत माने यांनी त्वरित तंत्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांना पाचारण करत ऑक्सीजन लाईन टाकण्याचे काम आज सकाळीच सुरू केले आहे. ते देखील येत्या 24 तासात पूर्ण होणार आहे. त्यामुळे एक मे रोजी हे डेडिकेटेड कोवाड सेंटर रुग्णांच्या सेवेसाठी सुरू होण्याचा मार्ग आता सुकर झाला आहे.

आमदार यशवंत माने यांच्या विकास निधीतून ऑक्सीजन लाईन ऑक्सीजन बेड आणि इतर आवश्यक ते वैद्यकीय सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

 या वेळी गटविकास अधिकारी गणेश मोरे, जिल्हा दूध संघाचे संचालक दीपकराव माळी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष प्रकाशभाऊ चवरे, शिक्षक नेते अनिल कादे, आनंदराव गावडे, राष्ट्रवादीची ओबीसी सेलचे अध्यक्ष राजाभाऊ सुतार, मिलिंद अष्टूळ, जावेद बागवान, विजयकुमार पोतदार ,जयराम गुंड, राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रशांत बचुटे स्वीय साहाय्यक संतोष ननवरे इत्यादी सह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget