पुणे-सोलापूरसह महत्त्वाच्या इतर 2 महामार्गांवरील टोल दरात वाढ, जाणून घ्या नवे दर




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

दरवर्षी 1 एप्रिल आला की टोलवाढ (Toll Plaza) होते तशी यंदाही झाली आहे. पुणे-सातारा (Pune-Satara Highway) रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम साडेदहा वर्षे रखडूनही कायम वाहतूक कोंडी ,अपघात होऊनही कंत्राटदाराला 5 टक्के टोल वाढीचे बक्षीस देण्यात आले आहे. 1 ऑक्टोबर 2010 ला पुणे-सातारा रस्ता 6 पदरी करण्याचं काम सुरू झालं. 31 मार्च 2013 ला हे काम संपणे अपेक्षित होते, मात्र अद्याप काम अर्धवट आहे.


या मार्गावर खेड शिवापूर आणि आनेवाडी असे 2 टोल नाके आहेत. आजपासून खेड शिवापूर टोल नाक्यावर हलकी वाहने असतील तर एकेरी प्रवासाकरता 100 रुपये तर दुहेरी प्रवास (रिटर्न टोल ) 150 रुपये पडतील. हलकी व्यावसायिक वाहने असतील तर हेच दर अनुक्रमे 160 आणि 240 रुपये असतील. बस किंवा ट्रक करता 340 ,505 इतका टोल असेल. मल्टी अ‍ॅक्सल वाहनांना एकेरी प्रवासाकरता 530 तर दुहेरी प्रवासाकरता 795 रुपये टोल असेल.


आनेवाडी टोल नाक्याला मोटारी ,हलकी वाहने यांना एकेरी प्रवासाकरता 70 तर दुहेरी प्रवासाकरता 105, हलक्या व्यावसायिक वाहनांना अनुक्रमे 110 आणि 170, बस किंवा ट्रककरता 235 आणि 350 तर मल्टी अ‍ॅक्सल वाहनांना एकेरी प्रवासाकरता 365 तर दुहेरी प्रवासाकरता 550 रुपये टोल द्यावा लागणार आहे.


पुणे-नाशिक रस्त्यावर टोल दर वाढले


पुणे-नाशिक रस्त्यावर चाळकवाडी आणि हिवरगाव तोल नाक्यावरही यंदा टोल दर वाढले आहेत. चाळकवाडी नाक्यावर हलकी वाहने 4, मोटारी यांना एकेरी प्रवासाकरता 45 रुपये , दुहेरी प्रवासाकरता 70 तर बस किंवा ट्रकला 160 आणि 240 रुपये इतका टोल भरावा लागणार आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget