कुटुंबातील व्यक्तींनी गोकुळ निवडणूक लढवावी यासाठी पी.एन.पाटील,महाडिक यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव






वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या विकासासाठी आणि आर्थिक स्थैर्यासाठी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाचे मोठे योगदान आहे. गेल्या ४० वर्षांत गोकुळची झालेली प्रगती, वाढलेले दूध संकलन, दूध उत्पादकांसाठी आणि पशुपालकांसाठी राबविलेल्या योजना यामुळेच गोकुळ आशिया खंडातील अग्रणी सहकारी संस्था बनला आहे. गोकुळचे नेतृत्त्व करणार्‍या आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, अरुण नरके यांच्यासह सर्व संचालक मंडळांनी पारदर्शी कारभार केल्याने, गोकुळची प्रगती झाली आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. ३,१३,२३ या ठरलेल्या दिवशी दूध उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे देऊन आणि त्याचवेळी आधुनिक यंत्रसामुग्रीचा वापर करून गोकुळने सचोटी आणि कार्यक्षमता सिद्ध केली आहे. म्हणूनच नावारुपाला आलेल्या गोकुळवर कब्जा मिळविण्यासाठी काही संधीसाधू राजकीय मंडळी टपून बसली आहेत. 

      या निवडणुकीत ३ मंत्री, २ खासदार आणि काही आमदारांनी एकत्र येऊन, गोकुळविरोधी पॅनेल बनविले आहे. त्या पॅनेलमध्येही नेत्यांनी आपल्या मुलांना किंवा नातावाईकांना प्रामुख्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नावेद मुश्रीफ, खासदार मंडलिक यांचे चिरंजीव वीरेंद्र, माजी आमदार बिद्रीचे चेरमन के.पी.पाटील यांचे चिरंजीव रणजित, ए.वाय.पाटील यांच्या पत्नी अश्यांना उमेदवारी दिली आहे. यामुळे हि निवडणूक अटीतटीची होणार आहे. विरोधी आघाडीतील नेत्यांच्या अमिषाला व दबावाला ठरावधारक मतदार बळी पडू शकतात. अशा परिस्थितीत गोकुळच्या सत्ताधारी पॅनेलनेही गाफिल न राहता, तोडीस तोड उमेदवार देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच सत्ताधारी पॅनेलमधील नेतेमंडळींनीसुद्धा कुटुंबातील व्यक्ती निवडणूक रिंगणात उतरविले पाहिजेत तरच  विरोधी पॅनेलला तुल्यबळ टक्कर देता येईल व त्यांचा बिमोड होईल, यासाठी गेले २ दिवस अनेक शिष्ट मंडळं पी.एन.पाटील व महादेवराव महाडिक यांची मनधरणी करीत आहेत. गोकुळच्या अनेक हितचिंतकांकडून हि अशीच मागणी होत आहे. 

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget