स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची सेवा ज्येष्ठता निश्चित करून त्यांना पदोन्नती देण्यात यावी.




आमदार प्रणिती शिंदे यांची मा. राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम यांच्यासोबत बैठक


सोलापूर // प्रतिनिधी 

आमदार प्रणिती शिंदे यांनी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांची सेवा ज्येष्ठता निश्चित करून त्यांना पदोन्नती देण्यात यावी याबाबत मा. राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांच्यासोबत बैठक आयोजित केली होती. यावेळी सचिव बांधकामे सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई श्री. ऐ.बी. गायकवाड, उपसचिव आस्थापना सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई श्री. नितीन खेडकर, अवर सचिव आस्थापना सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई श्री. विक्रम ढसाळ, कार्यासन अधिकारी आस्थापना 1 सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्रालय मुंबई श्री. सतिश हडपे, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ मुंबई श्री रणजित हांडे, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ पुणे श्री. अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ सोलापूर श्री. संतोष शेलार आदि उपस्थित होते.


       या बैठकीमध्ये सोलापूर सार्वजनिक बांधकाम मंडळ येथील कार्यालयात गेल्या अनेक वर्षापासून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कार्यरत आहेत. शासन निर्णय कार्यासन अधिकारी, आस्था 1, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र जा.क्र. ज्येष्ठता 2020/प्र.क्र. 24/भाग-1/(1)/आस्था-1/सन 2020, दि. 24/12/2020 पत्रान्वये दि. 0211/2020 रोजी प्रसिध्द केलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांच्या तात्पुरत्या ज्येष्ठता यादीमध्ये समाविष्ठ असलेल्या अनेक स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांनी विविध स्वरुपाचे आक्षेप नोंदविलेले असून अशा सर्व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांची यादी परिशिष्ट-अ नुसार कळविण्यात आलेली होती. सदर यादीतील मंडळांतर्गतच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकांकडून लेखी स्वरुपात आवश्यक असलेले पूरावे सादर करण्यात आले आहेत. तसेच मा. अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सोलापूर यांचे अहवाल जा.क्र.सा.बां.मं./आस्था-2/28/सन 2020, दि. 05/01/2020 अन्वये मा. अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, सोलापूर यांनी वस्तुस्थिती, नियमांच्या आधारे शहानिशा करून स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (अर्हता परिक्षा, विभागीय परिक्षा आणि प्रशिक्षण नियम, 2001 मधील नियम 3 (1) व (2), नियम-4, नियम-9, नियम-10 व नियम-13) या नियमातील तरतुदीनुसार अधिसुचना नियम 2001 मधील नियम क्र. 9 (2) नुसार नियम 13 मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या कालावधीमध्ये (2 संधीमध्ये व पहिल्या परिक्षेच्या दिनांकांपासून 4 वर्षाच्या कालावधीत) परिक्षा उत्तीर्ण झाले असल्यामुळे मुळ ज्येष्ठता गमवत नाहीत असा अभिप्राय देण्यात आला आहे. सदर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांनी सेवा ज्येष्ठता निश्चित करून त्यांना पदोन्नती मिळावी यावर चर्चा करण्यात आली.


याबाबत मा. राज्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम श्री. दत्तात्रय भरणे साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद देवून सांगितले कि, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक यांचे ज्येष्ठतेबाबत दि. 06/04/2021 पर्यंत सुधारित अंतिम ज्येष्ठता यादी (शुध्दीपत्रक) काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. प्रत्येक कर्मचाऱ्यांची वैयक्तिकरित्या जेष्ठता अहवाल तपासण्यात यावा. प्रशासकीय अथवा अनियमितामुळे विभागीय परिक्षेस बसता आले नसल्यास संबंधित परिक्षेचे वर्ष 4 वर्षाच्या कलावधीमध्ये वगळण्यात यावा असा निर्णय या बैठकीमध्ये झाला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget