पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 50 टक्के लस द्याव्यात आमदार परिचारक यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

 



पंढरपूर // प्रतिनिधी 
 
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली असून यामुळे या दोन्ही तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे येथील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर लसी पैकी पन्नास टक्के लसीकरण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात करावे अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

याबाबतचे पत्र आमदार परिचारक यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री  यांना मेलव्दारे  पाठविले आहे. यामध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी दोन्ही तालुक्यातील कोरोना रूग्णांच्या वाढीचा उल्लेख केला आहे. सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळून आले आहेत. आज पर्यंत एकूण ११ हजार ३०० जणांना कोरोना झाला असून २६४ जणांचा यामुळे जीव गेला आहे. दरम्यान पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक नुकतीच पार पडल्यामुळे लोकांचा एकमेकाशी मोठ्या प्रमाणात संपर्क आला आहे. याचा परिणाम म्हणजे केवळ मागील सात दिवसात एक हजारहून अधिक रूग्ण पंढरपूर शहर व तालुक्यात आढळून आले आहेत. जिल्ह्यात पंढरपूर तालुका कोरोनाचा हॉटस्पॉट बनला आहे. यामुळे येथील जनता भयभीत झाली आहे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत असले तरी वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यास मंजूर लसी पैकी पन्नास टक्के लसी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यास मिळाव्यात अशी मागणी आमदार परिचारक यांनी केली आहे. 

या दोन तालुक्यात लस कमी प्रमाणात येत असल्याने नागरिक आरोग्य केंद्रामधून वापस जात आहेत. यासाठी पंढरपूर व मंगळवेढा येथे दोन लसीकरण केंद्र वाढवावेत व जास्तीतजास्त लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget