सोलापूर // प्रतिनिधी
आजच्या परिस्थितीमध्ये सोलापूर शहरात कोरोना संसर्ग रोगाचा प्रसार झपाट्याने पसरत असून रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे सत्ताधारी भाजपच्या निष्क्रिय कारभारामुळे मुबलक प्रमाणात आरोग्यसेवा मिळाला नसल्यामुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत आहे व जनतेमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या लॉकडाउनमुळे छोटे-मोठे उद्योगधंदे बंद पडले आहेत व्यापारी वर्ग व रोजंदारीवाले यांचे आर्थिक नियोजन कोलमडलेले आहे.
अशा परिस्थितीत नागरिकांना सोलापूर महापालिकेच्या वतीने करात सवलत देण्याएवजी सत्ताधारी भाजपच्या वतीने महापालिकेच्या प्रशासनाच्या आडून शहरासह हद्दवाढ भागातील नागरिकांकडून मिळकतकरामध्ये 20 टक्के करवाढ करून जनतेस वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहे. शहरातील रस्ते, ड्रेनेज, गटारी, दिवाबत्ती, याचे अनेक कामे प्रलंबित आहेत नगरसेवकांना विकास निधी मिळत नाही, शहरांमध्ये आठ दिवसाला पाणीपुरवठा होत असून पाणीपुरवठ्याचे नियोजन सुद्धा कोलमडले आहे. नवीन उत्पन्नाचे कोणतेही स्त्रोत निर्माण करण्याचा प्रयत्न महापालिकेतील सत्ताधारी भाजप पदाधिकाऱ्यांनी आजपर्यंत केलेला नाही. महापालिकेत सत्ताधारी भाजपचे पदाधिकारी गटातटाच्या भांडणात व्यस्त असून प्रशासनावर त्यांचा वचक नाही. सोलापूर महापालिकेतील सत्ताधारी भाजपने ही अन्यायकारक मिळकतकर वाढ करून सोलापूर शहरातील जनतेवर आर्थिक बोजा लादत आहे म्हणून ही अन्यायकारक करवाढ केल्यास काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे आता इशारा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनी दिला आहे.
असे पत्रक शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या सूचनेनुसार प्रसिद्धि व मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला यांनी काढले आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.