(घसरलेल्या टक्केवारीचा कुणाला बसणार फटका)
252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी आज पार पडलेल्या मतदान प्रक्रियेमध्ये संपूर्ण मतदारसंघात 68 टक्के इतके मतदान झाले असल्याचे खात्रीलायक वृत्त असून यामध्ये पंढरपूर शहर व मंगळवेढा शहरामध्ये टक्केवारी घसरल्याचे दिसत आहे यामध्ये शहरी भागातील लोकांमध्ये मतदान व निवडणूक प्रक्रिया याबाबतीतील निरुत्साह पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे त्याच बरोबर covid-19 भीतीपोटी लोक घराबाहेर न पडल्याचे सध्याला तरी दिसत आहे यामध्ये पंढरपूर तालुक्यातील 22 गावे व मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भाग यामध्ये चांगल्या पद्धतीने मतदान झाल्याचे एकूण दिसत असले तरी या घसरलेल्या टक्केवारीचा नक्की कुणाला फायदा व कोणाला तोटा होणार हे येत्या 2 मेला समजणार आहे.
252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून समाधान महादेव आवताडे, तर महा विकास आघाडीकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली होती या पोटनीवडणुकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले असून येत्या 2 मेला 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचा आमदार "कोण" हे निकाला नंतरच ठरणार आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.