गोकुळ च्या निवडणुकीमध्ये सत्ताधारी गटाची प्रचारामध्ये संपूर्णपणे आघाडी




कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी पॅनेल निश्चितीसाठी काहीच दिवस उरले असताना सत्तारूढ गटाच्‍या उमेदवारांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व ठरावधारकांशी सरळ संपर्क साधला आहे. त्यांच्याशी संपर्क साधून आपली भूमिका, गोकुळचे कार्य व भविष्यातील गोकुळची धोरणे याबद्दल माहिती देत प्रचारात आघाडी घेतली.


विशेष म्हणजे सत्तारूढ यावेळी “राजर्षि शाहू आघाडी” या नावाने पॅनेल करत असून सर्व संभाव्य उमेदवार एकत्रित प्रचार करताना दिसत आहेत. सत्‍तारूढ आघाडी आमदार पी.एन.पाटील व माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्‍या नेतृत्‍वाखाली निवडणूक लढवीत असून प्रत्‍येकास व्‍यक्तिगत जबाबदारी दिलेली आहे, त्‍याप्रमाणे सर्वजन प्रचारात कार्यरत आहेत.


          चेअरमन रविंद्र आपटे यांचे प्रतिनिधी म्‍हणून यामध्‍ये जेष्‍ठ संचालक रणजितसिंह पाटील, विश्‍वासराव जाधव, धैर्यशिल देसाई, दिपक पाटील, पी.डी. धुंदरे, उदय पाटील, बाळासाहेब खाडे, अंबरिश घाटगे, सत्‍यजित पाटील, सदानंद हत्‍तरकी, चेतन नरके, अनुराधा पाटील, शौमिका महाडि‍क इत्‍यादींनी सहभाग घेतला आहे. चेअरमन रविंद्र आपटे आजारीपणात विश्रांतीमुळे मिडीयाच्‍या माध्‍यमातून ठरावधारकांच्‍या संपर्कात आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget