252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार समाधान दादा अवताडे यांनी सध्या आपल्या होम टू होम ग्राउंडला असलेल्या मंगळवेढा शहरातील अनेक आजी-माजी पदाधिकाऱ्यांना भेटण्यास सुरुवात केली असून त्यांच्या प्रत्येक निवासस्थानी जाऊन त्यांची चर्चा करण्यामध्ये त्यांनी वेळ दिला असल्याचे दिसत आहे यामध्ये समाधान दादा अवताडे यांनी आपल्या सर्व समर्थक व कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्यांची आपुलकीने विचारपूस करण्यास सुरुवात केली आहे यामुळे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीमध्ये सद्यस्थितीला चिन्ह मिळेपर्यंत समाधान दादा आवताडे यांनी होम टू होम प्रचाराला पहिल्यांदा प्राधान्य दिले आहे.
या सर्व भेटीगाठी वेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष शशिकांत चव्हाण चंद्रकांत पडवळे, नगरसेवक रामचंद्र कोंडुभेंरी, नगरसेवक महादेव जाधव, दिगंबर यादव, महेश जाधव या बरोबर अनेक समर्थक व कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.