राज्यातील क्रुझर, वाहनचालकांवरील होत असलेल्या अन्यायाबाबत छावा संघटनेच्या वतीने भाजपचे चंद्रकांत दादा पाटील यांचेकडे निवेदन देवुन न्याय मिळण्याची मागणी केली. परंतू या निवेदनाची चंद्रकांत दादा पाटील यांनी खिल्ली उडवल्याची टिका छावा संघटनेने पत्रकार परिषदेत केली आहे. याबाबत चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी अन्यथा पंढरपूर पोटनिवडणूकीच्या प्रचारास आल्यावर सभा त्यांची उधळून लावण्याचा इशारा छावा संघटनेने यावेळी दिला आहे.
लाॅकडाऊनमुळे राज्यातील क्रुझर वाहनचालकांवर उपासमारीची वेळ आली असून सध्या अनलाॅकनंतर सर्व पुर्वपदावर येत असतानाही क्रुझर गाडीमध्ये केवळ चार व्यक्तींनाच प्रवासाला परवानगी दिली जात आहे. हे निर्बंध रद्द करण्याची मागणी छावा संघटनेच्या वतीने भारतीय जनता पार्टीचे चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची खिल्ली उडवत निवेदनाच्या पाठीमागे राजकीय गणित मांडल्याचा आरोप छावा संघटनाने करीत होणारी त्यांची सभा उधळून लावण्याचा इशारा दिला.
यावेळी संघटनेचे शहराध्यक्ष सागर चव्हाण, शिवस्वराज्य संघटनेचे संदीप मुटकुळे, समाजसेवक संतोष कवडे, सुमित शिंदे, नागेश गायकवाड, प्रवीण घाडगे - पाटील, जमीर इनामदार, सुरज फुगारे, आण्णा ओमने, सचिन वडतिले, वैभव ठेंगील, विकी झेंड, निलेश कोरके, गणेश मलपे, रोहित इंदापूरकर, धनराज लटके, आदी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.