सोलापूर // प्रतिनिधी
पंढरपुर मंगळवेढा पोट निवडणुक भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची होणार असल्याचं चित्र आहे..महाविकास आघाडीकडून श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके तर भाजप कडून संत दामाजी साखर कारखान्याचे चेअरमन समाधान आवताडे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोन्ही कारखानदारांच्या विरोधात शेतकरी पुत्र सचिन शिंदे- पाटील यांनी आपले दंड थोपटले आहेत.. त्यामुळे प्रस्थापित कारखानदारांच्या विरोधात शेतकरी पुत्र लढत असल्याची चर्चा सध्या मतदार संघात सुरू आहे..
भगीरथ भालके चेअरमन असलेल्या विठ्ठल साखर कारखान्याने आणि समाधान आवताडे चेअरवर असलेल्या दामाजी कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊसाचे पैसे अजून दिले नाहीत.. त्यामुळे दोन्ही कारखान्यांवर आरआरसी ची कारवाई झाली आहे.... या दोन्ही उमेदवारांनी आधी शेतकऱ्यांचे पैसे द्यावे आणि मगच मत मागायला यावे असा आक्रमक पवित्रा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे..
स्वाभिमानी शेतकरी संघटना तालुक्यात मजबूत आहे.. ऊस आंदोलन, दूध आंदोलन, लाईट बिल, पुराचे किंवा दुष्काळाचे अनुदान मिळवून देण्यासाठी संघटना कायम आक्रमक राहिली आहे.. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्त्यावर उतरून आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे..
पंढरपूर मंगळवेढा पोट निवडणूक भावनीकतेच्या मुद्द्यांवर लढवली जात आहे.. परंतु या दोन्ही कारखान्यांवर अवलंबून असणाऱ्या हजारो कुटुंबाचं काय..? असा प्रश्न शेतकरी सभासदांमधून विचारला जाऊ लागला आहे..
सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरणारी स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतुन बाहेर पडून स्वतंत्र लढत असल्याने आता प्रस्थापित कारखानदारांच्या विरोधात विस्थापित शेतकऱ्यांच्या पोरानं दंड थोपटल्याची चर्चा सध्या मतदार संघात सुरु आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.