शेतकरी व्यापारी नागरिकांना दिलासा मिळावा.
आ.बबनराव शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली मागणी.
सोलापूर // प्रतिनिधी
सध्या देशभरामध्ये कोविड 19, ची दूसरी लाट आलेली असून सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोना बाधीत रूग्ण संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी सोलापूर यांनी कडक बदोबस्तात ल़ॉकडाऊन जाहीर करून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने एप्रिल अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. त्यामुळे शेतकरी व्यापारी व दुकानदार आर्थिक संकटात सापडले असून त्यांना दिलासा देणेच्या दृष्टीने कडक निर्बंध ठेवून जिल्ह्यातील दुकाने बाजारपेठा सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी आ.बबनराव शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक असून रूग्ण संख्खेत दिवसेनदिवस वाढ होत आहे.सोलापूर जिल्ह्यामध्येही त्याचा प्रभाव वाढत चाललेलाआहे. जिल्ह्यातील वाढती रुग्णसंख्या विचारात घेता जिल्हाधिकारी सोलापूर यांनी कडक ल़ॉकडाऊन जाहीर करून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने एप्रिल अखेरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केलेला आहे. त्यामुळे शेतकरी व्यापारी व दुकानदार मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आहेत. मागील वर्षाच्या मार्च महिन्यापासून कोरोना महामारीमुळे वेळोवेळी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे शेतकरी,व्यापारी,,उद्योगधंदे, लहान मोठा व्यवसाय करणारे दुकानदार ,मजूर यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले आहे. सततच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी,दुकानदार आर्थिक अडचणीत आलेले आहेत. मागील वर्षी देशात व राज्यात पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले होते.
सध्या जिल्हाधिकारी यांनी पुकारलेल्या लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचे अतोनात नुकसान होत असून व्यवसायासाठी बँकेकडून घेतलेले कर्ज, बँक कर्जाचे हप्ते, गाळा भाडे व इतर कौंटुबिक समस्या यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक ताण आलेला आहे. परिणामी त्यांचे व्यवसाय डबघाईला येवून त्यांचेवर उपासमारीची वेळ येणार आहे. पुढील काही काळ कोरोना या विषाणूशी सामना करत घालवावा लागणार आहे. या लॉकडाऊन संदर्भात जिल्ह्यातील व्यापारी, दुकानदार, यांचेसाठी कडक निर्बंध ठेवून कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करून दुकाने चालू ठेवण्यास परवानगी दिल्यास व्यापा-यांना कांही अंशी दिलासा मिळणार आहे. कडक निर्बध ठेवून दुकाने चालू करण्यास परवानगी देणेबाबत मागणी आ.शिंदे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे केली आहे.
चौकट
शेती पिकांचे नुकसान होऊ नये याची खबरदारी घ्यावी.
गेले वर्षभर शेतकऱ्यांची कोरोना मुळे आर्थिक कोंडी होत आहे लॉक डाऊन झाले की फळ उत्पादन करणारे, पालेभाज्या, भुसार माल पिकवणारे शेतकरी यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे शेतकऱ्यांनी पिकविलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देऊन त्यांना योग्य भाव मिळवून देण्याची खबरदारी प्रशासनाकडून घेणे गरजेचे आहे याचबरोबर शेतीऔजारे, ट्रॕक्टर, मालवाहतूक व शेती मालाची वाहतूक करणारी वाहने, दुचाकी वाहने यांची दुरुस्ती व सेवा देणारी केंद्रे सुरु ठेवायला परवानगी देण्याची मागणीही आ. बबनराव शिंदे यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचेकडे केली आहे.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.