काल दिनांक 9 एप्रिल 2019 रोजी 252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार भगीरथ भारत भालके यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा शहरात काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाहीर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी त्यांनी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसचे जुने सहकारी नगरसेवक अरुणभाऊ किल्लेदार यांच्या
निवासस्थानी सदिच्छा भेट दिली त्यावेळी अनेक जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला यावेळी स्वतः उपमुख्यमंत्री अजित (दादा) पवार यांनी अरूणभाऊ किल्लेदार साहेबांना असे सांगितले की कमीत कमी दहा वर्ष झाले तुमची माझी भेट होऊन दहा वर्षानंतर मी भेट घेत आहे. त्यामुळे तुमची माझी मैत्री खूप जुनी असून तुम्ही गोणेवाडी येथील रामेश्वर मासाळ यांच्यासाठी. माझ्याकडे आला होतात अशी ही यावेळी त्यांनी जुनी आठवण नगरसेवक अरुण किल्लेदार यांना करून दिली.
मंगळवेढ्यातील या अजितदादा पवार व माजी नगरसेवक अरूणभाऊ किल्लेदार यांच्या भेटीने राजकीय वर्तूळात मोठी चर्चा होत असून आता राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार भगीरथदादा भालके यांना मोठी ताकत मिळत असल्याचे म्हणले जात आहे.
यावेळी अजित दादा पवार यांच्याबरोबर सोलापूर जिल्ह्याचे पालक मंत्री दत्तात्रय मामा भरणे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भगीरथ (दादा)भालके, रामेश्वरजी मासाळ, आदी सर्व मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.