फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये 'ट्रान्सफॉर्मिंग इनोवेटिव्ह आयडीयाज इन टू रियॅलिटी' यावरती वेबिनार संपन्न




वृत्तसंस्था // प्रतिनिधी 

येथील फॅबटेक टेक्निकल कॅम्पसमध्ये दिनांक १०  एप्रिल रोजी 'ट्रान्सफॉर्मिंग इनोवेटिव्ह आयडीयाज इन टू रियॅलिटीया विषयावर ऑनलाईन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होतेया वेबिनारसाठी डॉशिरीष खेडीकर शास्त्रज्ञ भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून ऑनलाईन उपस्थित होतेत्यांचे स्वागत  फार्मसी महाविद्यलयाचे प्राचार्य डॉसंजय बैस यांनी केले. पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्राशरद पवार यांनी त्यांची थोडक्यात ओळख करून दिली. डॉ. शिरीष  खेडीकर यांनी  एकाच वेळी १० पेटंटची नोंद केली आहे. दहा यंत्रणांच्या शोधासाठी त्यांनी 'पेटंट डिझाइन्स आणि ट्रेडमार्क्स' कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया मध्ये याची नोंद केली आहे. संस्थेचे चेअरमन  मॅनेजिंग डायरेक्टर माश्रीभाऊसाहेब रुपनर  कॅम्पस  डायरेक्टर श्रीसंजय अदाटे  यांच्या मार्गदर्शनाखाली हा वेबिनार आयोजित करण्यात आला होता.

     यावेळी डॉ. शिरीष खेडीकर  यांनी  कल्पना व बौद्धिक मालमत्ता अधिकार  याविषयीची सविस्तर माहिती विद्यार्थी व प्राध्यापकांना दिली. त्यामध्ये पेटंट लायसन्स कसे मिळवायचे त्याचे फयदे याबद्दलची सविस्तर माहिती त्यांनी दिली. तसेच आपल्या डोक्यामध्ये असणाऱ्या अनेक आयडीयाज असतात त्यालाच प्रत्येक्षात मृत स्वरूप देऊन त्यातून नवीन काय साध्य करता येईल काय हे पहिले पाहिजे. नवनवीन  तंत्रज्ञान वापरून अनेक छोटे छोटे इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइसेस बनवू शकतो. याबरोबरच पर्यावरण पूरक मॉस्किटो ट्रॅप किंवा नेट, सोलर ट्रॅकिंग पॅनल, मोटरसह एअर कूलर, ऑटोमॅटिक वॉटर लेवल डिटेक्टिव यंत्र असे अनेक छोटी उपकरणे आपण बनवू शकतो. त्यासाठी आपली नाविन्यपूर्ण मानसिकता कशी विकसित करता येईल. आपणास प्रोत्साहित करणारे पेटंट कसे शोधायचे, त्याची फाईल कशी बनवायची, याची माहिती आपणास कोठे मिळू शकते याबद्दलची  त्यांनी सविस्तर माहिती दिली.

    या कार्यक्रमास फार्मसी  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस, अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. आर बी शेंडगे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा.शरद पवार  सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमोल पोरे व आभार प्रा. सर्फराज काझी यांनी केले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget