सोलापूर // प्रतिनिधी
आवताडे तुम्ही उद्योजक म्हणून शोभता पण आमदार म्हणून नाही शोभत शेतकऱ्या़चे सभासदत्व रद्द करणाऱ्याला जनता स्विकारत नाही.हे या दोन्ही तालुक्यातील जनतेनी गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभूत करून दाखवले आहे.
ज्यांनी कधी जनतेसाठी,त्यांच्या पाणी प्रश्नासाठी, विकास कामासाठी आंदोलन केले नाहीत ते दोन्ही दादा आज आमदार व्हायला निघाले आहेत. कारखान्याचा चेअरमन झाला की आमदारकी स्वप्ने पडू लागतात. शेतकऱ्यांची ऊसबील थकीत ठेवणाऱ्याला ही जनता कधी आमदार बनवत नसते.कामगारांनी पगार मागितला म्हणून त्या कामगाराला जेलमध्ये टाकणाऱ्याला जनता आमदार करत नसते.
शेतकऱ्यांच्या हितासाठी धडपडणाऱ्या सौ. शैलाताई गोडसे यांनी पाणी प्रश्नासाठी त्यांनी बंधाऱ्यात उतरुन आंदोलन करून म्हैसाळ पाणी योजनेमध्ये काही गावे वगळली होती अशा आठ गावांचा समावेश या योजनेत करून या गावातील लोकांचा पाणी प्रश्न सोडवला.अशा जनतेच्या हितासाठी धडपडणाऱ्या सौ.शैलाताई गोडसेंना यंदा शिट्टी च्या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा असे आवाहन प्रभाकर देशमुख यांनी लेंडवे चिंचोळी,शिरशी या गावातील जनतेला केले


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.