बोगस बांधकाम कामगार नोंदणी चौकशी प्रकरणी आरपारची लढाई करणार.:- विष्णु कारमपुरी (महाराज)




सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत झालेल्या बोगस बांधकाम कामगार नोंदणी करुन कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला आहे . याबाबत चाकशी कामी केंद्रीत जनमाहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत नोंदणी झालेल्या कामगारांची माहिती व ठेकेदारांची माहिती देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. परंतु विहिध मुदतीत माहिती दिले नाही आणि प्रथम अपिलीय अधिकारी देखील माहिती देता येत नाही असा निर्णय दिला . म्हणून बोगस बांधकाम कामगार नोंदणी चौकशी प्रकरणी आरपारची लढाई करणार असा इशारा महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी दिला आहे.           

सोलापुर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामार्फत बांधकाम कामगारांच्या योजनेचे लाभ मिळण्यासाठी जिल्हास्तरीय सहाय्यक कामगार आयुक्तांची नेमणुक करण्यात येऊन बांधकाम कामगारांना योजनेचा लाभ घेण्यासाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणी करण्याचे नियम केला आहे . आणि या कामगारांना प्रमाणित करण्याचे अधिकार सहाय्यक कामगार आयुक्तांना देण्यात आले . याचा फायदा घेऊन सोलापुर सहाय्यक कामगार आयुक्त श्री निलेश यलगुंडे व बांधकाम कामगार योजनेचे अधिकारी यांनी बाहेरील दलालांना हाताशी धरुन लाखो बोगस बांधकाम कामगारांची नोंदणी करुन कोट्यावधी रुपयाचा संघनमताने भ्रष्टाचार केला याबाबत चौकशी करावी अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने करण्यात आली . आणि बांधकाम कामगार योजना सुरु झाल्यापासुन आजपर्यंत नोंदणी झालेल्या कामगारांची यादी व ठेकेदारांची यादी केंद्रीय जनमाहिती अधिकार या आधारे माहिती मागण्यात आले. परंतु राज्य जनमाहिती अधिकारी तथा सुविधाकार श्री. एस. डी. रजपुत यांनी सदर माहिती विस्तृत व व्यापक स्वरुपाची असल्याने देता येणे शक्य नाही असे दि. २३/२/२०२१ या पत्राने कळविले . म्हणून सदर माहितीसाठी प्रथम अपिलीय अधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त श्री येलगुंडे यांच्याकडे अपिल करण्यात आले . त्यावरुन प्रथम अपिलीय अधिकारी साहेबानी दि . ७/४/२०२१ रोजी सुनावणी ठेवली. या सुनावणीत प्रथम अपिलीय प्राधिकारी तथा सहाय्यक कामगार आयुक्त श्री. निलेश यलगुंडे यांनी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे राज्य जनमाहिती अधिकारी तथा दुकाने निरीक्षक श्री. एस. डी. रजपुत यांनी माहिती देण्याबाबत दिलेली पत्र योग्य व नियमानुसार आहे . म्हणून माहिती देता येत नाही असे निर्णय दिला. म्हणून महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सदर बोगस बांधकाम कामगार नोंदणी प्रकरणात झालेल्या कोट्यावधी रुपयाचा भष्टाचार उघड करण्यासाठी आता आरपारची लढाई करण्यात येईल असा इशारा विष्णु कारमपुरी (महाराज) यांनी दिले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget