पंढरपूरसाठी स्वामी समर्थ क्लिनिक वरदान ठरेल: आमदार प्रशांत परिचारक




पंढरपूर // प्रतिनिधी

पंढरपूर येथील नागालँड चौकात  उभारलेले स्वामी समर्थ डेंटल क्लिनिक नागरिकांसाठी वरदान ठरेल अशी अपेक्षा सोलापूर जिल्ह्याचे आमदार प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केली.डॉ.सारंग सदाशिव झेंडे यांच्या दातांच्या दवाखान्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यापुढे बोलताना ते म्हणाले की दात हे दीर्घायुषी जीवनाचे प्रतीक मानले जातात, अशा दातांची निगा राखण्यासाठी उभारलेले क्लिनिक लोकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य निश्चितच फुलविणार आहे .
डॉ. सारंग झेंडे बोलताना म्हणाले की आपल्या क्लिनिकमध्ये  उपलब्ध असणारी रूट कॅनालची सुविधा व त्यासाठी आवश्यक असणारे नवनवीन तंत्रज्ञानाचे मशीन  सोलापूर जिल्ह्यात फक्त आपले ठिकाणी उपलब्ध आहे, अत्याधुनिक व नवनवीन तंत्राने दाताची निगा व स्वास्थ्य जपण्याचा प्रयत्न करणार आहोत.
सदर कार्यक्रमाचे प्रसंगी माजी नगराध्यक्ष नागेश भोसले, समाजसेवक नागेश सिंघण,  युवा नेते प्रणव परिचारक , रोहन परिचारक, नगरसेवक संग्राम अभ्यंकर, नवनाथ रानगट, तुकाराम राऊत, नारायण सिंघण, डॉ. अभिजित खुपसंगीकर,  अर्बन बँकेचे संचालक शांताराम कुलकर्णी, सतीश मुळे, उमेश विरधे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार प्रशांत परिचारक यांचा सत्कार सदाशिव झेंडे यांचे हस्ते करण्यात आला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget