पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक साठी च्या प्रचार सभा या दोन्ही तालुक्यातील ग्रामीण आणि शहर भागातून सद्या महाराष्ट्र राज्य सरकार मधील असंख्य मंत्री आणि आमदार, तसेच विरोधी पक्षनेते यांचे या मतदारसंघात प्रचाराच्या सभा होत आहे.,रँले निघत आहेत.मोठमोठे स्टार प्रचारकांची हजेरी या मतदारसंघात लागत आहे. जनतेला विविध विकासकामाची आश्वासन दिले जात आहे.मंगळवेढ्यातील पस्तीस गावाच्या पाण्यासाठी आश्वासन दिले जात आहे.प्रलंबित एमआयडीसी, ऊसबील थकीत, कामगारांचे वेतन, रखडलेले विकासकामे आदी प्रश्नावर वर चर्चा केली जात आहे.तसेच आश्वासन दिले जात आहे.
मतदार बंधूना सहानुभूती व भूमीपुत्र सारख्या भावनिकतेचे भांडवल करून मतदान खेचण्याचे प्रयत्न केले जात आहे. तर सौ.शैलाताई गोडसे या शेतकऱ्यांचे प्रश्न उपस्थित करून विरोधकांना हैराण करीत आहेत.जनहित संघटनेचे प्रभाकर देशमुख हे प्रचारक सोडले तर एकही स्टार प्रचारक सौ.शैलाताई गोडसे आणि प्रभाकर भैय्या देशमुख यांनी संपूर्ण मतदारसंघ आपल्या घणाघाती भाषणाने हलवून सोडला आहे. शासनकर्ते,आणि विरोधकांना पंढरपूर मंगळवेढा तालुक्यातील पाणीप्रश्न,ऊसबील थकीत प्रकरण,कामगारांचेवेतन,रखडलेली विकासकामे,एमआयडीसी, आदी समस्येवर आपल्या प्रचारसभेत, घरभेटीमधून हे विषय मांडून सत्ताधारी, तसेच विरोधकांना आता बोलते केले आहे. जनतेमधून या दोन्ही तालुक्यातील जिव्हाळ्याचे प्रश्न सत्ताधारी तसेच विरोधकांना विचारले जात आहेत.
कुठलाही स्टार प्रचारक नसताना देखील सौ.शैलाताई. गोडसे आणि प्रभाकर भैय्या देशमुख यांनी मतदारसंघ ढवळून काढला आहे. सौ.शैलाताई गोडसे यांना सर्वत्र प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.