(तहसीलदार निलेश मडके साहेब व डॉ तेलंग साहेब यांच्या पुढाकारातून कीर्तनाचे आयोजन)
अकोट अंतर्गत येत असणाऱ्या देवरी फाटा जवळील आदिवासी आश्रम शाळा येथे कोरोणा रुग्णांचे विलगीकरण कक्ष निर्माण केलेले आहे. अकोला जिल्ह्यातील सरकारी दवाखान्या मधील बरेच कोरोना पेशंट विलगीकरणना करिता आदिवासी आश्रम शाळा येथे विलगीकरण कक्षात पाठवले जातात अशा वेळेस कोरोना पेशंटचे मनोबल वाढण्याकरिता प्रशासन व सरकार बरेच काही उपक्रम राबवताना दिसत आहेत पण रुग्णाची एक प्रकारे मानसिकता वाढण्याकरिता धार्मिक प्रबोधनाची नितांत गरज आहे हा महत्त्वाचा विषय लक्षात घेऊन आकोट येथील तहसीलदार श्री निलेश मडके साहेब व डॉ अनंत तेलंग साहेब हॉस्पिटल मॅनेजर यांच्या पुढाकारातून विश्व वारकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष ह-भ-प श्री गणेश महाराज शेटे यांच्या हरी कीर्तनाचे नियोजन करण्यात आले होते
याप्रसंगी कीर्तनामध्ये विलगीकरण कक्षातील सर्व पेशंट सोशल डिस्टन्स ठेवून, तोंडाला मास लावून शासनाच्या नियम अटी चे पालन करून कीर्तन-श्रवणाच्या करीता बसले व कीर्तनाचा मनसोक्त आनंद घेतला कीर्तनामध्ये महाराजांनी सांगितले महाराष्ट्रातील कोरोना प्रादुर्भाव कमी करण्याकरिता सत्ताधारी पक्ष ,विरोधी पक्ष, प्रशासन सर्व सामाजिक ,धार्मिक संघटना शर्तीचे प्रयत्न करीत आहेत आणि त्यामध्ये जनतेचे सहकार्य मिळण्याची फार मोठी अपेक्षा आहे सध्या परिस्थिती कोरोणाची दुसरी लाट ही महाभयंकर आहे. बरेच पेशंट कोरोना झाल्यामुळे मरत नसून त्यांचे मनोबल खचल्यामुळे ,मानसिकता ढासळल्या मुळे, आपल्या मित्र मंडळींनी आप्तेष्टांनी आपल्याला दूर लोटलच्या आभास झाल्यामुळे मरण पावत असताना दिसत आहेत आणि म्हणून अशा परिस्थितीत आपण डगमगून न जाता आलेल्या संकटांना खंबीरपणे तोंड देऊन सामोर जाणे हे महत्त्वाचे आहे जीवनामध्ये संकटे येतच असतात हे कळण्याकरिता संत ज्ञानेश्वर महाराज ,जगद्गुरु तुकाराम महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू रामचंद्र , श्रीकृष्ण भगवान यांच्या जीवनात सुद्धा अतोनात संकट आले पण त्यांनी संकटाचा सामना केला.
आपणही या वैश्विक महामारी मध्ये डगमगून न जाता आलेल्या संकटाला खंबीरपणे तोंड द्यावे कारण की आपण आपल्या कुटुंबा मध्ये महत्वाचे आहात आपल्या कुटुंबाला आपल्या गावाला आपली नितांत गरज आहे. हे विषय कीर्तनामध्ये सांगून महाराजांनी रुग्णांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला व सर्व जनतेने कोरोना लस घेऊन या भारत देशातून कोरोणाला पळून लावण्या करीता सहकार्य करावे ही विनंती सुद्धा केली .सध्या बरीच धार्मिक स्थळे बंद आहेत पंढरपूरच्या पांडुरंगाचे मंदिर बंद आहे पण मला असं वाटतं पंढरपूरचा पांडुरंग कदाचित विटे वरून उतरला असेल आणि डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार, आशा वर्कर अशा विविध रूपात येऊन जनतेची सेवा करीत असेल म्हणून आपण सर्व जनतेने यांना सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे हा विषय महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितला व अकोट मध्ये जे कीर्तनाचे नियोजन करण्यात आलेल हे अकोट पॅटर्न सरकारने पूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवून महाराष्ट्रातील कीर्तनकारांना कोरोना पेशंटचे मनोबल वाढवण्याकरिता किर्तन सेवेची संधी द्यावी ही प्रशासनाला व सरकारला विनंतीही करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवर डॉ अनंत तेलंग, धनंजय सपकाळ, अभिषेक परमार्थ, नीता नागे, सुषमा भगत, संजय भाऊ शेळके, अरविंद शेगोकर, नितीन अप्पा गोंडगरे, विवेक गोंडगरे ही वैद्यकीय क्षेत्रातील उपस्थित असून किर्तनाला साथ संगत विलास महाराज कराड, विक्रम महाराज शेटे, सोपान महाराज ऊकर्डे, संतोष महाराज घुगे ,गजाननराव मोडक अजाबराव कुचेकर ,किशोर कुटे यांनी साथ संगत केली



Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.