श्री.दिगंबर मुनिनाथ महाराजांची पुण्यतिथी समारोप.




सोलापूर // प्रतिनिधी 

श्री. दिगंबर मुनिनाथ सांस्कृतिक मंडळाच्या वतीने अत्यंत साध्या व घरगुती पध्दतीने साजरा करण्यात आलेल्या श्री. दिगंबर मुनिनाथ महाराजांची पुण्यतिथी महोत्सवाचे तिर्थप्रसाद व महाआरती समारोप करण्यात आला.

         श्री. दिगंबर मुनिनाथ महाराजांची पुण्यतिथी समारोप दरवर्षी मोठ्या उत्साहात सात दिवस साजरा करण्यात येतो. परंतु २०२० व २०२१ यासाली कोरोना प्रार्द्रभावामुळे पुण्यतिथी महोत्सव साजरा करण्याचे रद्द करण्यात आले. परंतु पारंपारिक पुजापाठ व धार्मिकविधीनुसार यंदाच्या वर्षी गुढीपाढवा दि. १३ एप्रिल २०२१ ते १९ एप्रिल २०२१ असे सात दिवस मठातच पुजा, आरती करून गदी न करता विविध पुजेने साजरा करण्यात आले. या सात दिवसात दररोज अभिषेक , महाआरती असे सोहळा पुजारी आणि महारांच्या हस्ते करण्यात आले. दि. १९ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ६ वाजता झेंडा वंदन, ७ वाजता अभिषेक, ८ वाजता महाआरती आणि ९ वाजता प्रसाद वाटप करून समारोप करण्यात आला.

          सदर प्रसंगी विष्णु कारमपुरी (महाराज), श्रीनिवास कुसुरकर (महाराज), ह.भ.प. श्रीनिवास चिलवेरी, नागनाथ कारमपुरी, दशरथ नंदाल, नागार्जुन कुसुरकर, निलाबाई चिलवेरी, पुष्पावती वडेपल्ली, सुनंदा कुसुरकर, कलावती कुसुरकर, यमुना पिस्का, कविता केरमकोंडा, कौशल्या मुसकुर, ॲड . मुनिनाथ कारमपुरी, श्रीकांत कुसुरकर, प्रियंका कुसुरकर , स्नेहा कुसुरकर , शुभम कारमपुरी, अनुसुर्या कारमपुरी यांच्यासह गुरुभक्त गण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget