महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन




सोलापूर // प्रतिनिधी 

शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दि . २१ एप्रिल २०२१ पासून मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे . अशी माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे . 

           सोलापूरात कोरोना प्रार्दुभावाचा प्रभाव वाढत असल्याने नागरिकांना विविध माध्यमातुन मदत करण्यात यावी या उद्देशाने महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कोविड - १९ सेवा केंद्र उघडण्यात आले . या सेवा केंद्राद्वारे दि . २१ एप्रिल २०२१ ते ३० एप्रिल २०२१ पर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आलेली आहे . या शिबीरात प्रसिध्दी डॉ . श्री.मोहन तंबाके साहेब हे मोफत आरोग्य तपासणी करणार आहेत . वेळ सकाळी १० ते ११ यावेळेत कामगार सेना कार्यालय कुचननगर (पद्मशाली चौक) येथे शिबीर होणार आहे . 

          तरी सर्व नागरिक बंधु - भगिनी , विडी व यंत्रमाग कामगार बंधु - भगिनी या शिबीराचे लाभ घ्यावे असे आवाहन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस व वैष्णवी राणवे सेवा केंद्र प्रमुख यांनी केले आहे . 

            महाराष्ट्र कामगार सेनेच्या तातडीचे बैठकीत मोफत आरोग्य तपासणी शिबीर केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि शिबीरास तपासणीसाठी येण्याचे विनंती मा. डॉ. मोहन तंबाके साहेब यांना करण्यात आला. त्यास त्यांनी होकार दिला . 

        सदर प्रसंगी विठ्ठल कुऱ्हाडकर , दशरथ नंदाल , वैष्णवी रावणे , शोभा पोला , अनिता बटगिरी, अॅड . मुनिनाथ कारमपुरी , प्रसाद जगताप , प्रशांत जक्का , नरसिंग शेरला , संजीव शेट्टी , गणेश म्हंता , मनिषा , आदि उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget