सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोना रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करावे व बेड संख्या वाढवावी, सोमपा परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला यांची मागणी




सोलापूर // प्रतिनिधी

कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोना रुग्णांना देण्यात येणारे रेमडेसिविर इंजेक्शनची अत्यंत आवश्यकता असते. सोलापूर शहर व जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. काही मेडिकल समोर इंजेक्शन मिळण्यासाठी रांगा लागल्याचे दिसून येत आहे. आपल्या नातलगांचे जीव वाचवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांचे रेमडेसिविर इंजेक्शन मिळवण्यासाठी धावाधाव चालू आहे. इंजेक्शन न मिळाल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी इंजेक्शनचा काळाबाजार चालू आहे असे ऐकिवात आहे. तसेच रेमडेसीवीर इंजेक्शनच्या वेगवेगळ्या कंपनीच्या दरात तफावत असून सर्व कंपन्यांचे दर (MRP) एकच असले पाहिजे. तसेच सोलापूर शहरात काही कोरोना रुग्णांना बेड मिळत नसुन त्यामुळे रुगनांचे हाल होत आहेत रुग्ण दगावण्याची परिस्थिती निर्माण होणार आहे या परिस्थितीचा गाम्भीर्यने विचार करुण रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने पाऊल उचलावे व रुग्णालयातील बेड संख्याही त्वरित वाढवावी असे निवेदन सोलापूर महानगरपालिका परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला यांनी मा जिल्हाधिकारी सोलापूर व मा. आयुक्त सोलापूर महानगरपालिका यांच्याकड़े ईमेलद्वारे निवेदन देऊन केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget