अतिरिक्त साखर साठयामुळे साखर उद्योगाचे आर्थिक गणित कोलमडले:- डॉ. यशवंत कुलकर्णी




सोलापूर // प्रतिनिधी

चालू हंगामात महाराष्ट्रामध्ये शंभर लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन  श्रीपूर: साखरेला बाजारपेठेमध्ये मागणी नाही. साखरेची एमएसपी ३१०० रुपये असून या दराला कोणत्याही परिस्थितीत व्यापार्‍याकडून मागणी होत नाही. त्यामुळे साखरेचे प्रचंड साठा  कारखान्यांकडे सध्या पडू आहेत. अगोदरच साखर धंदा अडचणीत असून अतिरिक्त असणाऱ्या साखरेमुळे खऱ्या अर्थाने साखर कारखानदाराचे  आर्थिक गणित कोलमडले आहे. साखरेच्या विक्रीवर याचा परिणाम होत आहे., आणि त्यामुळे दर कमी झाले आहेत. अशी माहिती पाडुरंग कारखानयचे कार्यकारी संचालक डों यशवंत कुलकर्णी यांनी दिली साखरेचे उत्पादन प्रचंड प्रमाणात झाल्यामुळे मागणी आणि पुरवठा याचा समतोल साधता येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये पाठीमागच्या कित्येक महिन्यांपासून कारखान्याकडून होणारे साखर विक्रीचे प्रमाण अत्यंत अल्प झालेले आहे. त्यामुळे अतिरिक्त साखरचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारखान्यांना अशी वाढीव साखर साठा करण्याकरिता तात्पुरत्या स्वरूपाची गोडाऊन उभा करून त्याच्यामध्ये साखर ठेवण्याची व्यवस्था करावी लागली आहे. या साखरेला बँकांकडून प्ल्येज लोन देण्यामध्ये अडचणी निर्माण होत आहेत. एमएसपी या दराने सुद्धा कुठलाही व्यापारी साखर खरेदी कराल तयार नाहीये त्यामुळे हे साखरेची पोती अशीच गोदामात पडून राहिल्याने प्रतिटन साडेचारशे रुपये पर्यंत एवढा मोठा आर्थिक बँकांच्या व्याजाचा बोजा कारखान्यास सहन करावा लागतो. पुढच्या हंगामात ऊस दरावर परिणाम होण्याची शक्यता महाराष्टात आतापर्यंत ९५८ मेट्रिक टन उसाचे गाळप करून १०० लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाले. राज्यात गत वर्षीची ९० लाख टन साखर शिल्लक आहे. यातच चालू हंगामधील साखरेची भर पडल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या अतिरिक्त साखरेचा काय करायचं प्रशासनासमोर असा प्रश्न यंदा पडणार. साखर कारखानदारांची मोठी अडचण निर्माण झाली आहे त्याचा परिणाम साखर दारावर होणार आहे. साखर दरात अशीच परिस्थिति राहिली तर पुढच् हंगामात ऊस दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.  तोडणी वाहतूक खर्च आणि उसापासून साखर तयार होणारा खर्च याचा विचार केला तर शासनाने साखरेची एमएसपी ३१०० रुपये अत्यंत तुटपुंजे आहे. त्यामुळे जवळजवळ तीनशे रुपये पर्यंत या रकमेमध्ये अपुरा दुरावा निर्माण होतो. ३५०० रुपये साखरेची किंमत होणे अभिप्रेत आहे. तसेच निर्यातीवरील सबसिडी आठशे ते हजार रुपये पर्यंत वाढ झाली पाहिजे. यामधून कारखान्यांना शेतकऱ्यांची एफआरपी देणे शक्‍य होणार आहे. 

:-

डाॅ. यशवंत कुलकर्णी कार्यकारी संचालक पाडुरंग कारखाना,श्रीपूर

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget