श्रीपूरच्या पांडुरंग कारखान्याने अजून एक टाकले पुढचे पाऊल! (वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या आवाहनाला प्रतिसाद देत करणार ऑक्सिजन निर्मिती)

 





कोविडची भयावह स्थिती आणि ऑक्सीजनची वाढती गरज लक्षात घेता, राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारावेत. असे अवाहन वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्याने केले आहे. दरम्यान, येथील श्री पांडुरंग कारखान्याने अॉक्सिजन प्रकल्प उभारणीसाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने राज्यातील साखर काखान्यांचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक यांना ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाबाबत अवाहन करण्यात आले आहे. संस्थेचे डायरेक्टर जनरल शिवाजीराव देशमुख यांनी एका पत्राद्वारे, कोविडची सदयस्थिती, ऑक्सिजनची गरज आणि पुरवठ्यातील मर्यादा याबाबतची माहिती दिली आहे. यापुर्वी राज्यात आणि देशात प्रत्येक आप्तकालीन परिस्थितीमध्ये साखर कारखान्यांनी भरीव मदत व सहकार्य केले आहे. नैसर्गीक आणि राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी साखर कारखाने नेहमीच मदतीसाठी पुढे आले आहेत. राष्ट्रीय कर्तव्य आणि सामाजिक दायित्वाची जोपासना करणा-या साखर उद्योगाने सदयस्थितीत देखील पुढाकार घेऊन नागरिकांना दिलासा दिला पाहिजे या भावनेने संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निर्देशानुसार हे अवाहन करण्यात आले असून, सर्व कारखाने आपल्या कारखान्यात ऑक्सीजन निर्मिती व पुरवठा करतील अशी संस्थेला खात्री वाटत असल्याचे संस्थेने नमूद केले आहे. 

उपलब्ध साधनसामुग्रीचा होऊ शकेल वापरः

ज्या साखर कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप चालू आहे, ज्यांचे सहविजनिर्मिती व आसवनी प्रकल्प कार्यरत आहेत अशा प्रकल्पांनी वैद्यकीय ऑक्सीजनची निर्मिती करावी. ज्या कारखान्यांचा हंगाम संपलेला आहे अशा कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रासाठी रूग्णांना अथवा कोविड सेंटरला ऑक्सीजन कीटचा पुरवठा करावा. 

कारखान्यांची सद्याची साधनसामुग्री व मनुष्यबळाचा वापर करून कारखान्यांनी ऑक्सीजन निर्मितीचे प्रकल्प उभारावेत. ऑक्सीजन निर्मितीचा प्रकल्पासाठी वाफ व विजेची गरज असते. साखर कारखाना चालू असताना कारखान्यांमध्ये वाफ आणि विजेची उपलब्धता असते. याशिवाय, काखान्यांची उपलब्ध साधनसामुग्री व मनुष्यबळ याचा उपयोग या प्रकल्पासाठी करता येणार आहे. त्यामुळे, साखर काखान्यांनी उभारलेल्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाचा खर्चसुध्दा कमी होणार आहे. याचा विचार करता साखर कारखान्यांनी ऑक्सीजन निर्मितीचे प्रकल्प उभारणे गरजेचे झाले आहे.

 राज्य व केंद्रशासनासह कारखान्यांनी घ्यावा पुढाकारः

राज्यात आणि देशात दिवसेंदिवस कोविडची स्थिती भयावह होत चालली आहे. रूग्णांना मोठ्या प्रमाणावर ऑक्सीजनची गरज भासत आहे. राज्य सरकार व केंद्रशासन ऑक्सीजनच्या उपलब्धतेसाठी प्रयत्नशिल आहेतच तथापि, आपल्या सर्व साखर कारखान्यांनी पुढाकार घेऊन, उपलब्ध साधमसामुग्री, मनुष्यबळ व गरज भासल्यास आवश्यक ते भांडवल घालून, आक्सीजन निर्मिती प्रकल्प उभारणे अत्यंत आवश्यक झालेले आहे. आसवनी प्रकल्पामध्ये इथेनॉल शुध्द करण्याचा आणि कार्बनडाय ऑक्साईड वेगळा करण्याचा अनुभव साखर कारखान्यांना आहे. याठिकाणी ङ्गक्त ऑक्सीजन वेगळा करायचा प्रकल्प उभारायचा आहे. त्यासाठी कारखान्यांनी व्हॅक्युमप्रेशर स्वींग ऍडसॉर्पशन प्रोसेसची माहिती घेऊन त्वरीत कार्यवाही करण्याची गरज आहे.

पांडुरंग उभारणार ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पः


“अनेक आघाड्यावर नावलौकिक असलेल्या पांडुरंग कारखान्याने अॉक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. (कै.) सुधाकरपंत परिचारक यांचा समृध्द वारसा पांडुरंग परिवाराला लाभला आहे. हा वारसा जोपासण्याचे काम कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांनी जोमाने सुरु ठेवले आहे. गेल्यावर्षी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर सॕनेटायझरचे उत्पादन व पुरवठा करणाऱ्या पांडुरंग परिवाराने आता अॉक्सिजन निर्मितीच्या दिशेने आपली पावले टाकायला सुरुवात केली आहे. समाजजिवनाची गरज लक्षात घेऊन पांडुरंगच्या व्यवस्थापनाने उचलले हे पाऊल नक्कीच स्वागतार्ह आणि अनुकरणीय असेच आहे.”

राज्यातील आणि देशातील कोविड रुग्णांची स्थिती अतिशय गंभीर आहे. अॉक्सिजची उपलब्धता आणि गरज यात मोठी तफावत आहे. या परिस्थितीत कोविड रुग्णांना दिलासा मिळावा या हेतूने अॉक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्याचा विचार पांडुरंगचे व्यवस्थापन करीत आहे. कारखान्याचे अध्यक्ष आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक माहिती घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आलेले आहे. यासंदर्भात आमचा, पाठपुरावा सुरू आहे. जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा केली आहे. प्रकल्प उभारणीसाठी सात, आठ महिन्याचा कालावधी लागत असल्याचे चांगले प्रकल्प उभारणी करणाऱ्या एजन्सींकडून सांगितले जात आहे. अशा प्रकल्पांसाठी तंत्रज्ञान पुरवणारी ‘सांघी’ नावाची नामांकीत संस्था असून, त्यांच्याशी आमची चर्चा चालू आहे. 


डॉ. यशवंत कुलकर्णी. कार्यकारी संचालक श्री पांडुरंग कारखाना.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget