सोलापूर // प्रतिनिधी
टाकळी सिकंदर येथील जिल्हा परिषद प्रशाला या ठिकाणी पाटकुल प्रायमरी हेल्थ केअर सेंटर यांचे माध्यमातून कोविशील्ड या ॲन्टी-कोरोना लसीकरण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.या दिवशी टाकळी सिकंदर, आढेगाव, फुलचिंचोली या परिसरातील सुमारे 190 जणांना कोविशील्ड ही लस टोचण्यात आली. परंतु मर्यादित लस उपलब्ध झाल्याने अनेक जणांना लस न घेताच माघारी परतावे लागल्यामुळे निराशा पदरी पडली. लसीकरण सुरू होऊन सुमारे एक महिना झाला तरी नागरिकांमध्ये लस घेण्याबाबत उदासिनता आढळत होती मात्र अलीकडच्या काही दिवसात कोरोना साथीने उग्ररूप धारण केल्याने व ऑक्सिजनच्या व रेमेडीसिवर इंजेक्शनच्या कमतरतेमुळे हॉस्पिटलमध्ये ओढवलेल्या बिकट प्रसंग बघून लोकांमध्ये लस घेण्याबाबत सकारात्मकता वाढली असून आता लस घेण्यासाठी झुंबड उडायला लागली आहे. मात्र लस सर्वांना पुरवण्यात प्रशासन कुठेतरी कमी पडतेय असेच चित्र या शिबिरामध्ये पाहायला मिळाले.
गेल्या तीस दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सुमारे सात लाख लोकांना लस टोचण्यात आली असून या सात लाख लोकांपैकी फक्त 55 जण कोरोना बाधित आहेत आणि तेही त्यांना कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून आलीअसून
त्यांना हॉस्पिटल मधे दाखल होण्याची गरज पडली नाही. याचा अर्थ सदर लसीकरण कोरोना विरुद्ध च्या लढ्यात खूप फायदेशिर ठरत असून प्रत्येक नागरिकाने तातडीने, मनात कोणतीही शंका न बाळगता,न घाबरता त्वरित लसीकरण करून घेणे अत्यंत गरजेचे व अतिशय महत्त्वाचे असून एकाच वेळी संपूर्ण देशामध्ये जेव्हा लसीकरण प्रभावीपणे पूर्ण होईल तेव्हाच कोरोना विषाणू चे समूळ उच्चाटन होऊ शकेल असे वैद्यकशास्त्र सांगते पूर्वी जेव्हा प्लेग, देवी या रोगांनी थैमान घातले होते तेव्हाच्या काँग्रेस सरकारने संपूर्ण देशामध्ये एकाच वेळी सर्व नागरिकांना देवी या रोगाची विरुद्ध चे लसीकरणाचा खूप मोठा कार्यक्रम राबवला होता. त्यामुळे प्लेग व देवी सारखे असाव्यात व भयानक रोग देशातून हद्दपार झाले,त्यांचे समूळ उच्चाटन होऊ शकले होते.आता तशीच वेळ येऊन ठेपली असून कोरोना विरुद्ध च्या लढ्यामध्ये सर्व जनतेने लोकप्रतिनिधींनी आणि सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांनी गलिच्छ राजकारण विसरून सहभागी झाले पाहिजे तर आणि तरच आपण या महाभयंकर संकटावर मात करू शकू.
लॉकडाऊन चे नियम आपल्या सुरक्षेसाठी असून कोरोना शृंखला तोडण्यासाठी त्याचे काटेकोर पालन करावे. शेतकरी लॉकडाऊन प्रचंड अडचणीत असून त्याच्या जवळचा पैसा संपलेला आहे हे पुढील शेती करण्यासाठी त्याच्याकडे भांडवल नाही कौटुंबिक चरितार्थ चालवण्यासाठी त्याच्याकडे आर्थिक शक्ती उरलेली नाही अशा पार्श्वभूमीवर वरुणा लागण शेतकऱ्यांना परवडणारी नाही कारण हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतर होणारा खर्च हा डोळे पांढरे करायला लावणारा आहे आहे याचे भान ठेवून सर्व शेतकऱ्यांनी प्राधान्याने वेळ न दवडता कोरोना लसीकरण करून घ्यावे असे भावनिक आवाहन सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. संग्राम चव्हाण यांनी यावेळी बोलताना केले. राज्यात आणि देशात कोरोना ने हाहाकार उडवून दिला असून त्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे भव्य लसीकरण शिबिर मोहोळ तालुक्यामध्ये प्रथमच आयोजित करून यशस्वी केल्याबद्दल व संपूर्ण जिल्ह्यापुढे एक आदर्श ठेवल्यामुळे पाटकुल हेल्थ सेंटरचे मेडिकल ऑफिसर डॉक्टर हिंदुराव काळे, डॉक्टर करिष्मा शेख, टाकळी सिकंदर प्रायमरी हेल्थ केअर चे डॉक्टर जयसिंगराव देशमुख, मेघा सिस्टर तसेच सिस्टर स्वाती यादव ,आबेदा शेख, सुरेखा यादव,सुरेखा चव्हाण,कांचन घाडगे, सुजाता फरतडे, सुवर्णा अनुसे,मालन हराळे तसेच आशा वर्कर्स आशा गायकवाड,शितल वसेकर तसेच आशा वर्कर पार्वती सोनटक्के,शुभांगी शिखरे, वैशाली सोनटक्के, सुवर्ण जगताप, सुनीता पवार, कविता चव्हाण, टाकळीसिकंदरचे सरपंच तुकाराम चव्हाण,पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर चव्हाण,उपसरपंच शिराज तांबोळी,ग्रामपंचायत कर्मचारी मोहम्मद पठाण, देवा कदम,दादा एडके या सर्वांचे याप्रसंगी आभार मानले.
लसीकरण शिबिराला गलिच्छ राजकारणाचे गालबोट!
"भिमाचे "कार्यकारी संचालक शिंदे यांना लस नाकारली!
टाकळी सिकंदर येथे भव्य कोविशिल्ड लसीकरण शिबिराचे एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे या कौतुकास्पद उपक्रमाला गालबोट लावणारी घटना घडली.टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.सुर्यकांत शिंदे हे मूळचे उस्मानाबादचे. परंतु लॉकडाउनच्या कडक निर्बंधामुळे जिल्हा बंदीचे नविन आदेश पारित झाल्यामुळे टाकळी सिकंदर येथील लसीकरण शिबिरामध्ये लस घेण्यासाठी उपस्थित राहिले. परंतु काही उथळ, बेजबाबदार,गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या आखुड बुद्धीच्या कार्यकर्त्यांनी तसेच नेते मंडळीं नी टाकळी सिकंदर च्या बाहेरील व्यक्तींना लस देऊ नये असा आक्षेप घेत चर्चा सुरू केली व अपमानास्पद परिस्थिती निर्माण केली. आपल्यामुळे भीमा परिवार व सत्ताधारी ग्रामपंचायतीच्या कार्यकर्त्यांमध्ये तणाव निर्माण होऊन पुढील अनर्थ टाळण्यासाठी श्री. सूर्यकांत शिंदे हे केस पेपर तयार झालेला असताना सुद्धा वैद्यकीय तपासणी अर्धवट सोडून शिबिर सोडून निघून गेले व त्यांनी सोहाळे येथील लसीकरण शिबिरामध्ये जाऊन लस घेतली. शिबिर कॅम्पसमध्ये सदर घटनेचे संतप्त पडसाद उमटले. संपूर्ण जगापुढे कोरोना संकट उभे राहिले असतानासद्धा ह्यांना गलिच्छ राजकारण कसे सुचते?
घाणेरडे राजकारण कार्यकर्त्यांच्या किती रक्तात भिनले आहे! कार्यकर्त्यांना एवढेसुद्धा सामाजिक भान कसे काय नाही? कार्यकर्त्यांना वेळ काळाचे भान नसेल तर हे काय देशाला भविष्य देणार?असल्या लोकांनी राजकारणच करु नये!लसीकरणात राजकारण करणे म्हणजे अत्यंत खालची लेवल गाठणे!,असं व्हायला नको होतं! एका चांगल्या उपक्रमाला गालबोट लागले ! ही आपल्या टाकळी सिकंदर ची संस्कृती नव्हे ! अशा विविध, संतप्त व संमिश्र प्रतिक्रिया आल्या.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.