यशवंत (तात्या) माने यांच्याकडून आश्वासन पुर्ती





 (विनोद भैय्या महाडिक यांच्या प्रयत्नांना यश!)

   


सोलापूर // प्रतिनिधी

श्रीक्षेत्र पंढरपूर तालुक्यातील द्राक्ष बागायतदार म्हणून प्रसिद्ध असलेले पंढरपूर तालुक्याच्या पूर्वेकडील श्री क्षेत्र पुळूज येथील बाबर वस्ती ते पुळूज रस्ता डांबरीकरणाच्या कामाची आश्वासनपुर्ती मोहोळ विधानसभा मतदार संघाचे आमदार यशवंत तात्या माने यांनी केले आहे. या बाबतीत त्यांनी मागील काही महिन्यापूर्वी पुळुज येथील जाहीर कार्यक्रमांमध्ये आश्वासन दिले होते. की बाबर वस्ती ते पुळुज हा रस्ता मी डांबरीकरण करून देईन! त्याची संपूर्ण पूर्तता झाली असून महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे सोलापूर जिल्ह्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे जाहीर पत्रानुसार हा रस्ता पूर्ण डांबरीकरण करून देण्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

यासाठी महाराष्ट्र राज्य लिंबु बागायतदार संघाचे उपाध्यक्ष

 विनोदजी  महाडिक यांनी व पुळुजचे सरपंच शिवाजी शेंडगे, पांडुरंग (तात्या) ताठे यांनी सातत्याने यासाठी पाठपुरावा केला होता यामध्ये हा रस्ता संपूर्णपणे डांबरीकरण करून देण्याचे आश्वासन आ.यशवंत तात्या माने यांनी केले होते.


याबद्दल पुळुजचे सरपंच व सर्व ग्रामस्थांनी आमदार यशवंत (तात्या) माने यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget