पंढरपूर // प्रतिनिधी
पत्रकार सुरक्षा समितीचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा पंढरपूर येथील विठ्ठल इन हॉल मध्ये दिमाखदार सोहळा पार पडला या कार्यक्रमास जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे विठ्ठल मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठल जोशी चैतन्य महाराज देगलूरकर उपविभागीय पोलीस अधिकारी कदम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले
आदर्श पत्रकार, प्रशांत मालवदे, सचिन भुसे, चैतन्य उत्पात, विश्वास पाटील गणेश गांडुळे, जाकीर नदाफ बाहुबली जैन दिनेश खंडेलवाल, अनिरुद्ध बडवे अभय जोशी अक्षय बबलाद यांना शाल पुष्पहार घालून सन्मान चिन्ह व सन्मान चिन्ह देऊन आदर्श पत्रकार म्हूणन सन्मानित करण्यात आलं आहे
आदर्श शिक्षक - किसन सरवदे
आदर्श डॉक्टर -डॉ सुरेंद्र काणे
आदर्श उदयोजक -अभिजित पाटील, आदर्श समाजसेवा - संजय ननवरे जीवन गौरव -बी पी रोंगे सर या सर्वाना शाल पुष्पहार घालून सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेश अध्यक्ष यशवंत पवार राज्य सचिव डॉ आशिषकुमार सुना सोलापूर शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी उपाध्यक्ष बीपिन दिड्डी अण्णा धोत्रे यांना देखील फेटा बांधून पुष्पहार घालून सन्मानित करण्यात आले या कार्यक्रम चे नियोजन जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी केले होते
या कार्यकमास इस्माईल शेख, दैनिक तुफान क्रांती चे संपादक मिरझा गालिब मुजावर संगप्पा कांबळे बाबा काशीद संभाजी गोसावी, आदम बागवान, मोहोळ तालुका अध्यक्ष अमर पवार सचिव ज्ञानेश्वर गवळी अशपाक तांबोळी जयंत पुराणिक ऋषिकेश मंगसूलकर तुकाराम तारापूरकर निलेश बनसोडे ऋषिकेश ननवरे संजय यादव यांची उपस्थिती होती
या प्रसंगी पत्रकारिता कशी असावी याबत जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांनी मनोगत व्यक्त करून पत्रकारांनी वास्तव लेखन करून समाजाचे प्रश्न पोटतिडकीने मांडावेत असं सांगून खरी पत्रकारिता कशी असते याचे अनेक उदाहरणं दिली यावेळी चैतन्य महाराज देगलूरकर युवा उदयोजक अभिजित पाटील डॉ काणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रम चे अतिशय सुंदर सूत्रसंचालन संजय जोशी यांनी केले असून आभार जिल्हा अध्यक्ष रामचंद्र सरवदे यांनी केले

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.