शासकीय हॉस्पिटल प्रमाणे खाजगी हॉस्पिटल मध्येही शासनामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोफतच करावे.


सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष मनोज प्रकाश यलगुलवार यांची मागणी


सोलापूर // प्रतिनिधी 

शासकीय हॉस्पिटल प्रमाणे खाजगी हॉस्पिटल मध्येही शासनामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोफतच करावे अशी मागणी सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष मनोज प्रकाश यलगुलवार यांनी मा. जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.


या निवेदनाद्वारे काँग्रेस कार्याध्यक्ष मनोज यलगुलवार यांनी अशी मागणी केली आहे की सध्या सोलापूरसह संपूर्ण देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यामुळे शासनामार्फत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाला थोपविण्याचा सध्याच्या काळात एकमेव मार्ग म्हणजे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणामुळे अनेकांचे कोरोनाला दूर ठेवण्यापासून मदत झाली आहे नागरिकांनी लसीकरणासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे पण सध्याच्या काळात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा होत असल्यामुळे अनेक लसीकरण केंद्रावर लसीकरण बंद असल्यामुळे परत जावे लागत आहे. 1 मे पासून 18 वर्षापुढील युवकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणावर लसीचे मागणी वाढणार आहे. अशातच अनेकांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा दुसरा डोस घेण्याची तारीख ही आलेली आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे तातडीने कोरोना लस उपलब्ध करून द्यावा जेणेकरून लसीकरण मोहीम सुरळीतपणे सुरू राहील.

सध्या कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बंद आहेत सध्या आर्थिक टंचाई जाणवत आहेत सोलापूरात बहुतांश कष्टकरी वर्ग असून बहुतेकजण पैसे देऊन कोरोना लस घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय होणार आहे. त्याचप्रमाणे 1 तारखेनंतर लस घेण्यासाठी गर्दीही वाढणार आहे. त्यामुळे कोरोनाला थोपवायचे असेल तर सध्याचा एकमेव मार्ग म्हणजे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण, आणि लस देण्याचा वेग वाढविण्यासाठी सर्वच नागरिकांना शासकीय हॉस्पिटल प्रमाणे शासनामार्फत खाजगी हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोफत करण्यात यावे ही विनंती.


तसेच सोलापूर शहरातील अनेक कोव्हिड सेंटर मध्ये अनेक गैरसोयी आहेत, त्याकडे लक्ष देऊन तातडीने दूर करण्यात याव्यात. तसेच महिलांसाठी स्वतंत्र कोव्हीड सेंटर असावेत तिथले कर्मचारीही महिला असावेत. त्याचप्रमाणे गरजू रुग्णाला ऑक्सिजन बेड, इंजेक्शन चा ही तुटवडा जाणवत आहे त्याकडे ही तातडीने लक्ष देऊन दूर कराव्यात असे निवेदन मा. जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कार्याध्यक्ष मनोज प्रकाश यलगुलवार यांनी केली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget