समाधान (दादा) आवताडे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील प्रचार दौऱ्याला तुफान गर्दी


252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील प्रचाराला आता जोर आला असून या पोटनिवडणुकीमध्ये भाजपा व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री समाधान महादेव आवताडे यांच्या मंगळवेढा तालुक्यातील प्रचार दौऱ्यामध्ये आज मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील अरळी, नंदुर, डोणज, भालेवाडी, फटेवाडी, कात्राळ, कर्जाळ, कागष्ट, डिकसळ, मरवडे,आदी गावांमध्ये मोठ्या संख्याने सर्व आभार उद्यापासून सर्व तरुण परिवर्तनासाठी एकवटली होती.

या प्रचार दौरा मध्ये आ प्रशांतराव परिचारक यांनी महा विकास आघाडीचे वाभाडे काढले असून यामध्ये त्यांनी ही महाविकास आघाडी नसून आघाडी असल्याचे आपल्या भाषणातून सांगितले त्याचप्रमाणे 2019 साली,विश्‍वास व्यक्त केला त्याचप्रमाणे त्यांनी विरोधकांच्या अनेक आव्हानांचा खरपूस समाचार घेतला.



आमदार परिचारक पुढे बोलताना म्हणाले की देशामध्ये व संपूर्णपणे महाराष्ट्र राज्यामध्ये आज कोट्यवधी रुपयांची रस्त्याची कामे देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या माध्यमातून सुरू असून पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आता पुन्हा एकदा परिवर्तन होणार असल्याचे यावेळी आवर्जून सांगितले.तुमचे एक मत परिवर्तन घडवू शकते असे असे आमदार परिचारक यांनी सांगितले यावेळी माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी विरोधी पक्षातील सर्व नेत्यांचा आपल्या राजकीय भाषा शैली मध्ये चांगलाच समाचार घेतला.




महायुतीचे उमेदवार समाधान दादा आवताडे बोलताना पुढे म्हणाले की तुम्ही पाहता लक्की रोजगार निर्मितीचा प्रश्न बऱ्याच वर्षापासून प्रलंबित होता गेल्या काही वर्षांमध्ये विविध माध्यमातून आम्ही नवतरुणांना रोजगार निर्माण करून दिला व त्यांच्या हाताला काम दिले अकरा वर्षांमध्ये विकासाची उंची वाढायला पाहिजे होती ती कुठेतरी  खुंटत असल्याचे दिसत आहे ज्यावेळेस निवडणुका येतात तेव्हा मुलभूत प्रश्नावर ती बोलली जाते परंतू ते कधी सोडले जात नाही महणूनच तुम्ही मला एकवेळ संधी द्या,मी नक्कीच आपले मूलभूत प्रश्न प्राधान्याने सोडवीन असे यावेळी सांगितले.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget