भीमा सभासदांनी भरभरून दिलेल्या मतांचा राष्ट्रवादीला विसर पडू नये! - प्रा.संग्राम चव्हाण जिल्हाध्यक्ष किसान काँग्रेस.





सोलापूर // प्रतिनिधी 

सोलापूर जिल्ह्यातील टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सन 2020-21 या वर्षाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदिवशी कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार श्री. धनंजय ऊर्फ मुन्ना साहेब महाडिक यांनी फक्त सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण भारत देशातील साखर कारखानदारी ही कशी प्रचंड अडचणीत आली असून राज्य सरकार तसेच केंद्र सरकार पातळीवर साखर उद्योग वाचविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची कशी  गरज  आहे याकडे  सरकारचे लक्ष वेधून घेत असताना खुद्द सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या कराड येथील सह्याद्री सहकारी साखर कारखान्या पुढेही शेतकऱ्यांची एफआरपी प्रमाणे बिले अदा करण्याचा यक्षप्रश्न  कसा निर्माण झाला आहे याकडे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यामागे कसलेही "घाणेरडे राजकारण" किवा प्रतिमा मलिन करण्याचा  वाईट हेतू नव्हता तर हा  हा प्रश्न किती गंभीर आहे व तमाम ऊस उत्पादक शेतकरी कसा प्रचंड अडचणीत आहे याकडे सरकारचे तसेच संबंधित जबाबदार पदाधिकारी वरिष्ठ नेते मंडळींचे लक्ष वेधून घेणे एवढाच प्रामाणिक हेतू होता.मा.सहकार मंत्री  यांचा गैरसमज करून देण्यात आला असून  श्री. धनंजय महाडिक ह्यांनी  राष्ट्रवादी पक्षाचे खासदार असताना शेतकऱ्यांचा जाणता राजा असलेले आदरणीय शरद पवार यांच्याशी सविस्तर चर्चा करून साखर उद्योगापुढील संकटांबाबत संसदेमधे वेळोवेळी प्रभावीपणे आवाज उठवला आहे.आज जरी ते कोल्हापूर मतदार संघातील प्रादेशिक राजकीय अडचणीमुळे भारतीय जनता पार्टी गेले असले तरीही अलीकडेच पार पडलेल्या मोहोळ विधानसभा निवडणुकीमध्ये भीमा कारखान्याचे 20 हजार सभासदांनी भारत देशाचे प्रगल्भ आणि अभ्यासू अन् शेतकर्यांच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व असणारे शरद पवार साहेब यांचेकडे बघून मोठ्या आशेने साखर कारखानदारी पुढील प्रश्न सोडवावेत या गंभीर हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झोळीमध्ये भरभरून मते टाकून मोहोळ विधानसभा विजयामध्ये सिंहाचा वाटा मिळवला आहे याचा विसर सहकार मंत्री श्री बाळासाहेब पाटील यांना पडला आहे काय? यामुळे आम्हाला वीस हजार सभासदांना खूप मनोवेदना झाल्या. गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी वीस कोटी रुपयांच्या कर्जाची राज्य शासनाने थकहमी घेतल्या मुळे कारखान्याचा यंदाचा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला. कारखान्याचे चेअरमन श्री धनंजय महाडिक यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असला तरीही राजकीय पक्ष - गट - तट या गोष्टींचा विचार न करता फक्त कारखान्याच्या वीस हजार सभासदांच्या चुलीचा विचार करून आदरणीय शरद पवार साहेब यांनी निष्पक्षपाती व सकारात्मकपणे भीमा कारखान्याला व राज्यातील इतर सहकारी साखर कारखान्यांना वीस कोटी रुपयांच्या थकहमी ची मदत केली. सभासदांच्या हिताच्या या "पगल्भ निर्णयाची" भीमा कारखानाच्या सर्व सभासदांना मनोमन जाणीव असून याबाबत यापूर्वी कारखान्याच्या संचालक मंडळाने भीमाच्या 20 हजार सभासदांच्या वतीने राज्य सरकारचे व खास करून आदरणीय शरद पवार साहेब,मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे,अजितदादा पवार बाळासाहेब पाटील व नानाभाऊ पटोले यांचे मनापासून जाहीर आभार मानलेले आहेत. राज्यातील साखर कारखानदारीसह संपूर्ण भारत देशातील साखर कारखानदारी ही ऑक्सीजनवर असल्याने आणि केंद्र सरकार साखर उद्योग वाचवण्यासाठी एकही पाऊल उचलताना दिसत नसल्याने शेतकर्यांना वाढल्यावर सोडुन दिल्याच्या भावनेने संपूर्ण देशातील शेतकरी धास्तावला असून त्याला वर्तमानपत्रातील राजकीय "टोलेबाजी,शेरेबाजी, पलटवार "वगैरे स्वस्त आणि ऊथळ गोष्टींमध्ये आता रस उरलेला नाही.बळीराजाच्या अस्तित्वाची लढाई सुरु आहे.राजकारणातील सर्वच पक्षाच्या आमदार, खासदार तसेच मंत्र्यांनी राजकारण आणि सत्ताकारण करत असताना शरद पवार यांनी आयुष्यभर दाखविलेल्या राजकीय प्रगल्भतेचा,सकारात्मक दृष्टिकोन व लोकाभिमुखतेचा आवर्जून अंगीकार करावा व संकटातील शेतकऱ्याला बाहेर काढण्यासाठी सरकारी पातळीवर,प्रशासकीय पातळीवर सर्वांनी शक्य तेवढे सर्व निकराचे प्रयत्न करावे आणि "काळ्या आईशी "शी इमान  राखावे असे प्रतिपादन सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण यांनी भीमा कारखाना टाकळी सिकंदर येथे आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले.आपल्या संपूर्ण राजकीय प्रवासात आदरणीय शरद पवार साहेबांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी जी खरी आस्था,काळजी दाखवली व  प्रत्यक्षात तशी पावले उचलली अगदी तशीच आस्था, काळजी अन् आक्रमकता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा राष्ट्रीय किसान काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले सुध्दा  दाखवत असुन तशी पावले ते त्यांच्या  राजकीय प्रवासात उचलत असल्याचा आवर्जून उल्लेख प्रा. संग्राम चव्हाण यांनी यावेळी केला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget