सोलापूर // प्रतिनिधी
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या शिफ़ारसीनुसार, समाजकारण, राजकारण, कला, क्रीड़ा, शिक्षण, उद्योग क्षेत्रात सातत्याने कार्य करणाऱ्या श्री मनोज प्रकाश यलगुलवार यांची सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यांचे निवडीचे पत्र महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष प्रणितीताई शिंदे व सोलापुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या हस्ते काँग्रेस भवन सोलापूर येथे प्रदान करण्यात आले.
यावेळी सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास बाबा करगुळे, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, NSUI जिल्हा अध्यक्ष गणेश डोंगरे, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, गणेश सालुंखे, दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष सैफन शेख, उत्तर विधानसभा युवक अध्यक्ष विवेक कन्ना, मध्य विधानसभा अध्यक्ष योगेश मार्गम, राहुल वर्धा, मनोज कुलकर्णी, राहुल गोयल, रवी आंबेवाले, परशुराम सत्तारवाले, धनराज गायकवाड़, गोविंद कांबळे, सुशीलकुमार म्हेत्रे, महेश लोंढे, प्रवीण जाधव, अनंत म्हेत्रे, युवराज जाधव, सुभाष वाघमारे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
श्री मनोज प्रकाश यलगुलवार हे गुरुकृपा युवा मंच व नॅब, क्रीड़ा व नाट्य संघटनांच्या माध्यमातून सामाजिक, अंध, दिव्यांग, मूकबधिर, कला, क्रीड़ा, शिक्षण क्षेत्रात त्यांचे कार्य सातत्याने सुरु असुन त्यांच्या या कार्यामुळेच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांची सोलापूर शहर युवक कांग्रेसच्या शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची सोलापूर लोकसभा युवक कांग्रेसच्या अध्यक्षपदी संधी मिळाली. त्यावेळी राज्यस्तरीय युवा महिला मेळावा व चलो वार्ड व चलो पंचायत, जनसंपर्क अभियान, जड़वाहतुक बंदीसाठी आंदोलन, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस संवाद पदयात्रा आदिंच्या माध्यमातून आपल्या कार्याची वेगळी झलक दाखवून दिली होती. तसेच सोलापूर महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर कोटयावधी रूपयांचा विकासनिधी खेचुन आणून वार्डाचा चौफेर विकास केला. शेकडो निराधारांना श्रावणबाळ व संजय गांधी निराधारचे पेंशन चालू करुण दिले. महापालिकेत आपल्या अभ्यासु कार्यपध्दतीमुळे आपल्या कार्याचा ठसा उमठविला. ते सध्या गुरुकृपा युवा मंच संस्थापक अध्यक्ष असुन, सोलापूर शहर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन उपाध्यक्ष आहेत. नैशनल असोसिएशन फ़ॉर द ब्लाइंड सोलापुरचे आजीवन सदस्य व अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सोलापूर चे सभासद म्हणून कार्य कारित आहेत. वडील माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांच्या छत्रछायेखाली वावरत असताना राजकारणाचा बालकडु लहानपासुनच मिळाला. त्यांच्यासोबत आजपर्यंत अनेक लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीचे नियोजन करण्याचे महत्वपूर्ण कामही केले आहे. वडील माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन कायमच पक्षाची विचारधारा, निष्ठा जपली असुन सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाण्याची वृत्ती, लोकांचे अड़ीअडचणी गरजुना मदत करण्याची त्यांच्या भावनेमुळे त्यांचा लोकसंग्रह खुप मोट्ठा आहे. नागरिकांच्या प्रश्नासाठी पुढाकार घेऊन ते सोडविण्याचे ते सतत प्रयत्न करत असतात. आजपर्यंत केलेल्या राजकीय कार्य, काँग्रेस पक्षासाठी व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणितीताई शिंदे यांनी मनोज यलगुलवार यांची सोलापुर शहर काँग्रेस कमिटी कार्याध्यक्षपदी निवड केली. यामुळे सर्वसामान्य नागरिक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये, तेलगू भाषिक समाजबांधवांमध्ये उस्ताह पसरला असुन येणाऱ्या सोलापूर महापालिका निवडूणुक व लोकसभा, विधानसभा निवडणुकीत निश्चितच पक्षाला याचा लाभ होईल.
निवड झाल्यानंतर बोलताना मनोज यलगुलवार म्हणाले कि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब व आमदार प्रणितीताई शिंदे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला तो सार्थ करुण दाखवेन, या पदाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे अड़ीअडचणी सोडविण्याचे व त्यांच्या प्रश्नाना वाचा फोड़ण्याचे, तसेच काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरणे पोहोचविण्याचे, पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगितले.
त्यांच्या निवडीनंतर राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करुण पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.