म.न.पा.कडून कोविड - १९ लस शिबिराचे आयोजन करावे.महाराष्ट्र कामगार सेनेची मागणी.


 


सोलापूर // प्रतिनिधी

सध्या सुरु असलेल्या कोरोना साखळी तोडण्यासाठी नागरिकांना भयमुक्त जीवन जगण्यासाठी कोविड - १९ चे लस देण्यासाठी महापालिकेच्या वतीने शिबीरांचे अयोजन करावे . अशी मागणी महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सो.म.पा. आयुक्त व कोरोना समितीप्रमुख मा . श्री . पी शिवशंकर साहेब यांना मेलद्वारे करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपरी ( महाराज ) यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे . 

           मा. म.न.पा. आयुक्त यांना दिलेल्या निवेदनात सोलापूर शहरात मोठ्या प्रमाणे कोरोना संसर्गजन्य रुग्ण आढळून येत आहेत . त्यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारचे तणाव व भयमुक्त परिस्थिती निर्माण झाली आहे . अशा परिस्थितीत कोविड - १९ लस देणे हेच पर्याय असून त्यासाठी कोविड - १९ च्या नियमास आदिन राहून जास्तीत - जास्त लोकांना लस देण्यासाठी शिबीरांचे आयोजन करण्यात यावे . त्याच बरोबर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कोविड - १९ सेवा केंद्राद्वारे कोव्हॅसिन लसीकरणाचे शिबीर अयोजित करण्यात आली असून सदर शिबीरास कोव्हॅसिन ( लस ) आणि आरोग्य अधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात यावे . अशीही मागणी सदर निवेदनात करण्यात आली आहे . सदर निवेदन मेलद्वारे *१) मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य , मुंबई . २) मा. उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई. ३) मा. आरोग्य मंत्री, महाराष्ट्र राज्य मुंबई. ४) मा. पालकमंत्री सोलापूर जिल्हा. ५)  मा. जिल्हाधिकारी, सोलापूर) यांनाही पाठविण्यात आलेली आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget