वृत्तसंस्था // प्रतिनिधी
Covid-19 च्या काळात लोककलावंत, कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट, यांच्यावर अडचणी चा पहाड निर्माण झालेला आहे.मागील वर्षी लोक डाऊन मुळे कलाकारांचा सादरीकरण बंद असल्यामुळे कुठलेच काम नाही.जमापुंज वर त्यांनी खर्च भागवीला.आता नेमका कुठे तरी काम सुरू होत असताना covid-19 चा वाढता प्रभाव अशा पद्धतीचे पुन्हा लोक डाउन प्रसंग उद्भवला आहे. लवकर महाराष्ट्र या मधून बाहेर पडेल आणि पुन्हा पूर्वपदावर येईल पण त्या आधी ज्या पद्धतीनं तृतीयपंथी कामगार, घरकामगार ,फेरीवाले, रिक्षावाले यांना मदत करायचं शासनाचा विचारात आहे त्याच धर्तीवर लोककलावंत, कलाकार, बॅकस्टेज आर्टिस्ट यांना पंधराशे रुपये सानुग्रह अनुदान दिलं तर त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवला जाईल त्या करिता शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान च्या वतीने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कडे शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांतदादा खाबिया ,शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान चे उपाध्यक्ष नंदकुमार बंड, शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक संदीप राक्षे, विदर्भ अध्यक्ष शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान शेखर पाटील यांच्या वतीने करण्यात आले या सानुग्रह अनुदान यामुळे कलाकारांना covid-19 च्या अडचणीच्या काळात दिलासा मिळेल.
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.