मधील खरीप व रब्बी हंगामातील पीक विमा रक्कम अजून पर्यंत शेतकऱ्यांना मिळालेली नाही . कोरोना महामारी व नैसर्गिक आपत्ती या दोन्ही परिस्थितीना तोंड देत असताना तो पूर्ण पणे हवालदिल झालेला आहे. गेल्या २०२० च्या खरीप हंगामात मूग व उळीद या पिकाचे १००% नुकसान झाले , सोयाबीनची दुबार पेरणी करण्याचे सुद्धा संकट शेतकऱ्यावर ओढवले व त्यातून उत्पादन क्षमता घसरली, सोबतच कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव असल्या कारणाने त्याही पिकाचे उत्पादन किरकोळ प्रमाणात झाले असून एकंदरीत तालुक्यातील पिकाची उत्पादन कमी असताना देखील शेतकऱ्यांना कृपको टोकियो विमा कंपनीने आज शेतकरी संकटात असतांना देखील तो विमा रकमेपासून अजून पर्यंत वंचित आहे ठेवलेला आहे .
सोयाबीन पिकाचे उत्पादन कमी झालेले असतांना त्या पिकाचे भाव गगनाला भिडलेले आहे . पुढील हंगामाचा विचार करता सोयाबीन शेतकरी चिंतेत आहे , कारण अद्याप पर्यंत अप्राप्त विमा रक्कम व पुढील पेरणीवेळी सोयाबीन बियाण्याची अव्वा च्या सव्वा वाढणारी किंमत याबाबत सुद्धा शासनाने त्यावर लक्ष घालून भविष्यात उद्भवणारी बियाणे बाबतची भाव वाढ यावर उपाय योजना करणे गरजेचे असून ,
आता सद्यस्थितीत तात्काळ मदत म्हणून २०२०- २१ वर्षातील खरीप व रब्बी हंगामातील विमा रक्कम ही तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी ही मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अनंतदादा राऊत,
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नितिन गावंडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा
सरचिटणीस किरण पाटील अरबट , जिल्हा उपाध्यक्ष गजानन जऊळकर , जिल्हा सरचिटणीस शुभम होले, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शराध्यक्ष कपिल पोटे , राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शराध्यक्ष प्रतीक नाकट , राष्ट्रवादी युवक चे सोशल मीडिया प्रमुख प्रज्वल शेळके यांनी निवेदनाद्वारे मागणी केली.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.