यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन नारायण (दादा)मोरे यांचे आज दुपारी पुणे येथे निधन झाले. याच महिन्याच्या सुरुवातीला त्यांना कोरोना झाल्याचे तपासणी नंतर उघड झाले होते. त्यातच उपचार सुरू असताना आज त्यांची प्राणज्योत मालवली.
या महिन्याच्या सुरुवातीला त्यांचे चालक गणेश शिरगिरे यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर नारायण मोरे यांना तसेच पतसंस्थेतील 3 कर्मचाऱ्यांना ही कोरोना लागण झाली होती. ते कर्मचारी नीट झाले मात्र मोरे यांचा चालक गणेश शिरगिरे यांचे मागील आठवड्यात निधन झाले.
नारायण मोरे यांची ही प्रकृती खालावत गेल्याने त्यांच्यावर पंढरपूर, सोलापूर येथील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले होते. अखेरीस पुणे येथे उपचार सुरू असताना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास त्यांचे निधन झाले.
नारायण (दादा)मोरे यांच्या निधनानंतर विठ्ठल परिवाराने दिवंगत आ भारत भालके, राजूबापू पाटील यांच्या पाठोपाठ आणखी एक नेता कोरोनामुळे गमावला आहे.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.