सोलापूर // प्रतिनिधी
महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने दि . २६ एप्रिल २०२१ वार सोमवार पासून ब्रेक द चेन कोरोना जन जागृती अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी दिली आहे .
संपुर्ण देशासह सोलापुरातही कोरोना महामारी मोठ्या प्रमाणात घालित आहे . सदर महामारी थांबविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दोन टप्यात लॉकडाऊन व कडक लाकडाऊन जाहिर केले आहे . आणि या लॉकडाऊनचे नियम जनतेला पाळण्याचे आवाहन केले आहे . परंतु जनता या लॉकडाऊनच्या नियमांचे गांभियाने दखल घेत नसल्याचे दिसून येते . यासाठी प्रशासन वेगवेगळया माध्यमातून प्रयत्न करित आहे . आणि सामाजिक संघटनांना कोरोना प्रार्दुभाव रोखण्यासाठी आणि इतर समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे . असे आव्हान करतांना विविध उपक्रम राबविण्याचेही आव्हान केले आहे . त्याच धर्तीवर महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने ब्रेक द चेन कोरोना या अंतर्गत विविध उपक्रम राबवित आहोत . त्याच धर्तीवर दि . २६ एप्रिल २०२१ वार सोमवार पासून जन जागृती अभियान राबविण्यात येणार आहे . या अभियानात विविध वास्त्यात , मोहोल्यात आणि गर्दी असलेल्या ठिकाणी मेघा फोनद्वारे कोविड -१ ९ चे प्रतिबंधात्मक सुचना व उपाय सांगण्यात येणार आहे . असेही महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणी विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांनी पत्रकार परिषदेत नमुद केले आहे .

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.