रात्रीच्या बारा ला सुद्धा कोरोना रुग्णांसाठी मदतीला धावून जात आहेत आ. बबनदादा




(ऑक्सिजन , रेमडेसिवीर इंजेक्शन , व्हेंटिलेटरबेड बबनदादा दररोज करतायत पाठपुरावा).


सोलापूर // प्रतिनिधी

राज्यात , जिल्ह्यात कोरोना ची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे . महाराष्ट्रामध्ये कोरोणा रुग्णांची संख्या दररोज साठ हजाराच्या आसपास सापडत आहेत, त्यामुळे सर्वसामान्य माणूस हैराण झालेला आहे .परंतु सोलापूर जिल्ह्यात विशेषता माढा ,करमाळा, पंढरपुर या भागातील लागण झालेल्या पॉझिटिव्ह रुग्णांना एक वेगळा आणि सुखद अनुभव बघायला मिळत आहे. तो म्हणजे   आमदार बबनराव शिंदे यांच्या बाबतचा आमदार बबनराव शिंदे हे सकाळपासून रात्री उशिरापर्यंत आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून अनेक कोरोणा रुग्णांच्या अडीअडचणी सोडविण्यात व्यस्त आहेत ,सध्या कोरोणाचे रुग्ण वाढल्यामुळे अनेक पेशंटला व्हेंटिलेटर बेड , रेमडीसेवीर  इंजेक्शन अशा वेगवेगळ्या कारणांसाठी बबन दादा दिवस-रात्र लोकांच्या संपर्कात आहेत .


आज दुपारी सुद्धा राज्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांना आ. शिंदे यांनी फोन करून सोलापूर जिल्ह्यात कोरोना च्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे रुग्ण ,त्यांचे नातेवाईक त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी रेमडेसिवीर इंजेक्शन व ऑक्सिजनचा आवश्यक प्रमाणात पुरवठा तातडीने करण्यात यावा अशी मागणी केली . यावेळी दादांनी मंत्री महोदयांना सांगितले की सध्या कोरोणाची फार भयानक स्थिती झाली आहे . आमच्याकडे आता ऑक्सीजन पाठवावा लागेल  . सोलापूर जिल्ह्यासाठी ऑक्सिजनची फार गरज आहे .तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन कुर्डूवाडी ला तात्काळ पन्नास तर पाठवावे लागतील . त्यात काय झाले जिल्ह्यासाठी एक हजार इंजेक्शन लागतात आणि येतायेत 200 माझ्याकडे माझ्या मतदारसंघात माढा तालुका ,पंढरपूर तालुका ,माळशिरस तालुक्यातील काही गाव आणि आमच्या संजय मामाच्या करमाळा तालुक्यातील गावात कोरोणामुळे वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे . 400 ते 500 इंजेक्शन वाढवून मिळाली पाहिजेत. आज पाठवलं तर बरे होतील अशी मागणी करताच मंत्री डॉ . राजेंद्र शिंगणे यांनी दोन दिवसात परिस्थिती सुधारून रेमडेसिवीर  इंजेक्शन उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही दिली . मंत्री राजेंद्र शिंगणे व आमदार बबनराव शिंदे यांच्यातील मोबाईल वरचे संभाषण आज दिवसभर सोशल मीडिया वरती वायरल होत होते . तसेच फेसबुक, व्हाट्सअप च्या माध्यमातून ज्यांना ज्यांना आमदार बबन दादा कडून मदत झाली असे कार्यकर्ते पोस्ट व्हायरल करीत आहेत .

 आमदार बबनराव शिंदे यांनी सोलापूर, पुणे ,अकलूज ,इंदापूर, बारामती ,बार्शी, कुर्डूवाडी अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या डॉक्टरांना फोनद्वारे संपर्क करून माढा तालुक्यातील कोविंड रुग्णांच्या अडचणी दूर करत आहे.

      या भागातील पॉझिटिव्ह रुग्णांना दवाखान्यात साधा बेड सुद्धा मिळत नाही, मग सामान्य नागरिक लगेच आमदार बबनदादांना  फोन करतात अन् दादांना फोन येताच दादा ही सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटल ,यशोधरा हॉस्पिटल ,मार्कंडेय हॉस्पिटल ,मुळे हॉस्पिटल, सिविल हॉस्पिटल, बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पिटल ,अंधारे हॉस्पिटल ,यादव हॉस्पिटल ,सोमानी हॉस्पिटल ,कॅन्सर हॉस्पिटल ,अकलूज येथील इनामदार हॉस्पिटल, राणे हॉस्पिटल, नवजीवन हॉस्पिटल ,गांधी हॉस्पिटल, पुणे येथील ससून रुग्णालय, रुबी ,संचेती हॉस्पिटल, नोबेल हॉस्पिटल, दीनानाथ, डॉक्टर केळकर ,डॉक्टर तात्याराव लहाने यांच्यापासून ते छोट्या मोठ्या डॉक्टरांना प्रत्यक्ष फोन करून मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत . रात्रिच्या बारा साडे बारा वाजता सुद्धा आमदार शिंदे हे सामान्य रुग्णांचा फोन उचलत असून त्यांना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करत असल्याने बबनदादा विषयी सामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget