आ. शिंदे यांच्या माध्यमातून रामवाडी परिसरातील गरजू लोकांना मोफत जेवण




सोलापूर // प्रतिनिधी 

आज रामवाडी परिसरातील रामवाडी, धोडिंबा वस्ती, येथील रोज गरजू 200 लोकांना मोफत जेवण  महानगरपालिका दवाखाना येथे आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या हस्ते वाटप करण्यास सुरुवात झाले.कोरोनाच्या महासंकटामुळे लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे.रामवाडी परिसरामध्ये कामगार संख्या व गंवडी कामगार मोठ्या प्रमाणात आहेत.सध्या सोलापूर शहरात संचारबंदी असल्यामुळे सर्व लोकांचे कामधंदा बंद आहेत.अशा परिस्थितीत आमदार प्रणिती  शिंदे यांनी गरजू गरीब लोकांना शहरात मोठ्या प्रमाणात मोफत जेवण वाटप करत आहे. आजपासून रामवाडी परिसरात 21 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत कोरोनाचे सर्व नियम पाळून  मोफत जवण रामवाडी दवाखाना जवळ दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत गरजू 

लोकांना वाटप करण्यात येणार असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले.

      यावेळी गणेश डोंगरे,चंद्रकांत नाईक,गोपाळदोडमनी,तुळशीदास जाधव,देवीदास नाईक,सचिन गायकवाड,रंगनाथ नाईक,राजू शिंदे,कुणाल जाधव,सागर भिसे,विकी आलाट,कुंदन गलांडे,दिनेश डोंगरे, अक्षय पवार,बबलू मकानदार,राजू नाईक,प्रमोद सारवाडकर,सागर जाधव,ओंकार पुला,आकाश नाईक,आरिफ मकानदार तसेच इतर नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget