महाराष्ट्र कामगार सेनेच्या कोविड - १९ सेवा केंद्राच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे उदघाटन




सोलापूर // प्रतिनिधी 

शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने मोफत आरोग्य शिबीराचे उद्घाटन महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश सरचिटणीस विष्णु कारमपुरो ( महाराज ) यांच्याहस्ते व कामगार सेनेचे अध्यक्ष दशरथ नंदाल यांच्या अध्यक्षतेखाली मा . डॉ . मोहन तंबाके यांच्या उपस्थितीत करण्यात आले.



           सध्या कोरोना प्रार्दुभाव दिवसें - दिवस वाढत असल्याने गोरगरीब कामगार झोपडपट्टी नागरीकांना इतर आजारामुळे होणारे त्रास कमी करण्यासाठी व तणावमुक्त आरोग्य जगण्यासाठी शिवसेना प्रणित महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने कोविड -१ ९ सेवा केंद्र उघडण्यात आले . त्या केंद्राद्वारे दि . २१ एप्रिल २०२१ रोजी सकाळी १० वाजता कामगार सेना कार्यालय पट्यशाली चौक येथे मोफत आरोग्य तपासणी केंद्राचे उद्घाटन विष्णु कारमपुरी ( महाराज ) यांच्या हस्ते व दशरथ नंदाल यांच्या अध्यक्षतेखाली , मा . डॉ . माहेन तंबाके , विठ्ठल कुऱ्हाडकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले . सकाळी १० ते ११ या वेळेत झालेल्या शिबीरात सुमारे ४५ ते ५० नागरिकांनी तपासणीचा लाभ घेतला . सदर आरोग्य शिबीर दि . २१/०४/२०२१ ते ३०/०४/२०२१ पर्वत चालणार आहे . वेळ सकाळी १० ते ११ तरी नागरिकांनी याचा लाभ घ्यावा .

          शिबीर यशस्वी करण्यासाठी श्रीनिवास बोगा , संजीव शेट्टी , अॅड . मुनिनाथ कारमपुरी , गणेश म्हंता, रुपेश सांळुखे , प्रशांत जक्का , अनिता बटगिरी , शोभा पोला , डॉ . मोहन तंबाके यांचे स्टाप व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले .

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget