(आ. प्रशांत मालकांनी केली मा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा)
पंढरपूर // प्रतिनिधी
पंढरपूरात केलेल्या अन्यायकारक लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी पंढरपुरातील व्यापारी बंधूनी आज मीटिंग आयोजित केली होती. तिथे जाऊन जिल्ह्याचे आ. मा. प्रशांतरावजी परिचारक यांनी व्यापाऱ्यांची समस्या जाणून घेतल्या.आणि विरोधी पक्षनेते मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क करून त्यांच्याशी समस्या बद्दल चर्चा केली.आणि शासन दरबारी ह्या संबंधी आवाज उठवून योग्य ती कारवाई करून हा अन्यायकारक लॉकडाऊन काढून योग्य ती खबरदारी घेऊन पंढरीतील व्यापाऱ्यांना दुकान उघडण्यास परवानगी द्यावी ह्या प्रकारची चर्चा झाली.
यावेळी मा.रणजितसिंह मोहिते-पाटील, मा.समाधान(दादा)आवताडे,भाजपा जिल्हाध्यक्ष श्रीकांत दादा देशमुख,प्रा.बी.पी.रोंगे सर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.