(आ. परिचारक यांनी घेतला विरोधकांचा खरपूस समाचार)
सोलापूर // प्रतिनिधी
252 पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघासाठी आज पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथे भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार समाधान महादेव आवताडे यांच्या प्रचारार्थ प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी च्या सर्व नेते मंडळींनी समाधान दादा अवताडे यांच्यासाठी सर्वांनी पुढे येऊन समाधान दादांना सहकार्य करावे असे आवाहन याप्रसंगी केले. याप्रसंगी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी कोणीही भूलथापांना बळी न पडता व भावनिक आवाहन बळी न पडता तुमच्या गावाचा व पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचा विकास करायचा असेल तर कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून श्री समाधान महादेव अवताडे यांना दिनांक 17 एप्रिल रोजी मतदान करा असे आवाहन यावेळी परिचारक यांनी सर्व ग्रामस्थांना केले.
अन्यथा ही निवडणूक बिनविरोध केली असती.आईचे राज्य मुलाने हिसकावून घेतल्याचा हा पहिलाच प्रकार आम्ही पाहतोय-आ.परिचारक
आज प्रचारार्थ पंढरपूर तालुक्यातील रांझणी या गावी भाजपची भव्य अशी प्रचार सभा झाली. सर्वात प्रथम सर्व कार्यकर्त्यांना भाजपा वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या सभेला मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
आमदार प्रशांत परिचारक यांनी यंदा भाजपा दीड लाख मते घेऊन विजयी होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
ते म्हणाले, "स्व. भारत भालके यांच्या पत्नी जयश्रीताई भालके या उमेदवार असत्या तर देवेंद्र फडणवीस यांनी ही निवडणूक बिनविरोध केली असती. मात्र आईचे राज्य मुलाने हिसकावून घेतल्याचा हा पहिलाच प्रकार आम्ही पाहतोय." असे परिचारक यावेळी म्हटले.
"पांडुरंग आणि दामाजी परिवार एक झाले म्हणून गाफील राहू नका प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचा." असे आवाहन त्यांनी युवा कार्यकर्त्यांना केले.
भारतीय जनता पक्ष व मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार मा.श्री.समाधान महादेव आवताडे यांचे प्रचार शुभारंभ ग्रामदैवत श्री.महादेव मंदिर,रांजणी येथुन जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टी जिल्हा प्रभारी,माजी राज्यमंत्री बाळाजी भेगडे, विधान परिषद आमदार मा.श्री.प्रशांत परिचारक,भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख,पंढरपूर मिस्टर नगराध्यक्ष नागेश भोसले, रयत क्रांती संघटना महाराष्ट्र कार्याध्यक्ष दीपक भोसले, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप घाडगे ,जिल्हा परिषद सदस्य,पांडुरंग कारखान्याचे व्हा. चेअरमन मा.श्री.वसंतनाना देशमुख, भाजप नेते मा.श्री.बी.पी.रोंगे सर,मा.श्री.दत्तात्रय जमदाडे,युवा नेते मा.श्री.प्रणवमालक परिचारक,शेतकरी संघटना अध्यक्ष मा.श्री.माऊली हळणवर,माजी उपसभापती मा.श्री.प्रशांत देशमुख,मा.श्री.सुनील सर्वगोड,पांडुरंग संचालक मा.श्री.सुरेश आगवणे,पंचायत समिती सदस्य मा.श्री.अरुण घोलप,मा.श्री.बाळासो देशमुख,मा.श्री.दिनकर मोरे,संचालक मा.श्री.हरिषदादा गायकवाड, मा.श्री.सुभाष मस्के, मा.श्री.भास्करराव कसगावडे, मा.श्री.भारत मोरे,मा.श्री. हरिभाऊ गावांधरे,जिल्हा परिषद सदस्य मा.श्री.बाळासो देशमुख,मा.श्री.संतोष देशमुख,मा.श्री.तुकाराम कुरे,मा.श्री.हरिभाऊ फुगारे,मा.श्री. सिताराम भुसे,मा.श्री.दादा मोटे,यांचे उपस्थितीत करण्यात आला.


Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.