पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात कारखानदार विरूद्ध शेतक-यांचा मुलगा अशी लढाई : रविकांत तुपकर





(स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन शिंदे यांच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचारसभा)


सोलापूर // प्रतिनिधी

२५२-पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत कारखानदार विरुद्ध सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा अशी लढाई आहे. साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची ऊस बिले न दिल्यामुळे तसेच वीजबिल वसुलीसाठी लाईट बंद केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराज आहे. त्यातूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक लावण्याचा निर्णय घेतला असून, यामध्ये शेतकऱ्यांची साथ मिळत असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी व्यक्त केले. 



मंगळवेढा तालुक्यातील पाटखळ, खुपसंगी, शिरशी, जुनोनी, हिवरगाव, तळसंगी, आदी गावांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन अरुण शिंदे यांच्या प्रचारार्थ प्रचार सभांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तुपकर बोलत होते. यावेळी स्वाभिमानी युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अमरसिंह कदम, उमेदवार सचिन शिंदे, युवा आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अड. राहुल घुले, जिल्हाध्यक्ष तानाजी बागल,दत्ता गणपाटील, तालुकाध्यक्ष श्रीमंत केदार, विश्रांती भुसनर, अमोल शिंदे, अनिल  पदाधिकारी उपस्थित बुरंगे आदी होते. तुपकर म्हणाले, मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणीप्रश्न कायमचा मार्गी लागावा, यासाठी राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली जनआंदोलन उभं करण्यात येईल. या ठिकाणच्या शेतकरी, कष्टकरी, शेतमजुरांचे प्रश्न संघटना मार्गी लावेल. स्वाभिमानी शेतकरी संघटना नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. दूध दरवाढ यासह विजेच्या प्रश्नावरही संघटनेने आवाज उठवला आहे, असेही तुपकर म्हणाले.       


शेतक-यांनी दिली मदत:

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार सचिन शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत उपस्थित शेतकऱ्यांनी आर्थिक मदतीचा हात पुढे करीत, संघटनेला मदत केली. शेतकर -यांमधून याला चांगला प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget