(विशेष मागणी)
सोलापूर // प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार साहेब पंढरीच्या पवित्र नगरीत येत आहेत; दादा आपलं पंढरी मध्ये मनःपूर्वक स्वागत...!!
दादा म्हणजे शब्दांचे पक्के; एक घाव दोन तुकडे; दादा उद्या असंख्य पंढरपूर करांना न्याय देणेसाठी पांडुरंगाच्या दारात येत आहेत;
१)शेतकऱ्यांना लुटणाऱ्या आणि लुबाडणाऱ्या कारखांदारांची दादांना प्रचंड चीड; त्यामुळे उद्या दादा अशा *कारखान्यांच्या चेअरमन लोकांच्या गचुऱ्याला धरून सर्वांसमोर राहिलेलं ऊस बिल, कामगारांचे पगार आणि वाहनांची देणी सुपूर्द करण्याचे लेखी आश्वासन घेतील.
२) दादांचे पंढरपूर मध्ये येण्याचे दुसरे आणि अतिशय महत्वाचे कारण म्हणजे कोण्या एका चेअरमन ने सभासदांच्या भाग भांडवलावर उभा केलेला कारखाना, सभासदांना कोणतीही पूर्व कल्पना न देता, त्यांना विचारात न घेता विकला आहे, म्हणून उद्या ते या दगाबाज चेअरमन ला लोकांसमोर उभा करणार आहेत, त्या कारखान्यावर सभासदांचे जे काही भागभांडवल असेल, गुंतवणुकी असतील किंवा ठेवी असतील त्या द.सा.द.शे 18% व्याजदराने शेतकऱ्यांना मिळवून देणार आहेत.
३)अजित दादा यांना भ्रष्टाचार आणि फसवणूक या बद्दल प्रचंड चीड आहे, त्यामुळे उद्या ज्या चेअरमन ने अर्जुन बँक बुडवली, विट्ठल बझार खाल्ला;
कारखाण्याच्या एफ ड्या जिरवल्या अशा लोकांचे दादा जनतेसमोर कपडे उतरवणार असल्याचे समजते
४) दादांचे सरकार म्हणजे शेतकऱ्यांचे सरकार, ज्या लोकांनी वीजबिल भरलं आहे, ते शेतकऱ्यांना परत देणार आहेत, तसेच रेग्युलर शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन पर मदत वाटणार आहेत.
५ ) दादांना छोट्या मोठ्या व्यावसायिकांवर अन्याय झालेला चालत नाही म्हणून उद्यापासून दादा लॉक डॉउन कॅन्सल करणार आणि पंढरी ओपन करणार आहेत...!!
असे हे आमचे दादा उद्याच सर्व प्रश्न निकालात काढणार आहेत...!!
म्हणून कार्यकर्त्यांनी उद्या स्टेज वर यायचं नाही...!!

Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.