पुळुज येथे कोरोना प्रतिबंध जनजागृती फेरी




सोलापूर // प्रतिनिधी 

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर व मा. गट विकास अधिकारी पंढरपूर यांनी केलेल्या सूचनेनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुळुज येथील शिक्षक व सर्व शासकीय कर्मचारी यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत कोरोना निर्मुलन जनजागृती काढण्यात आली. 


 गावातील नागरीकांना मास्क व सॅनिटायझरचा वापर करणे, पात्र नागरिकांना लस घेण्यासाठी प्रवृत्त करणे,  कोरोना पेशंटशी संलग्न असलेल्या व्यक्तीनी RTPCR चाचणी करून घेणे याबाबत आवाहन करण्यात आले आहे. यावेळी पंचायत समिती पंढरपूर च्या वतीने पुळूज गावासाठी पालक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आलेले केंद्रप्रमुख श्री ब्रम्हदेव घाडगे आणि पांडुरंग ताटे यांनी मोलाचे  मार्गदर्शन केले व कोरोना निर्मुलन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन निर्णायक लढा देण्याचे आवाहन केले. 


यावेळी सरपंच स्वाती कोंडकर,  शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दत्तात्रय पांढरे, बापू शिंदे, पांडुरंग ताठे, शिक्षक सिद्धेश्वर भुई, आशा  वर्कर, अंगणवाडी सेविका, डाॅ वाळूजकर,  बंडू बाबर, शिवाजी सलगर, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.

[blogger]

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget